इंद्रायणी महाविद्यालय अंतर महाविद्यालयीन पॉवरलिफ्टिंग स्पर्धा संपन्न
इंद्रायणी महाविद्यालय अंतर महाविद्यालयीन पॉवरलिफ्टिंग स्पर्धा संपन्न
तळेगांव स्टेशन (संपादक-डॉ. संदीप गाडेकर) दि. 9 सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीथांतर्गत पुणे जिल्हा विभागीय क्रीडा समिती व इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे इंद्रायणी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अंतर महाविद्यालयीन पॉवरलिफ्टिंग स्पर्धा दि ६ व ७ डिसेंबर रोजी महाविद्यालयाच्या केशवराव वाडेकर सभागृहात पार पडल्या. २७ महाविद्यालयाच्या एकूण ८० खेळाडूंनी स्पर्धेत सहभाग घेतला.
यावेळी इंद्रायणी महाविद्यालयातील प्रनोती नंब्रे व सेजल मोईकर याविद्यार्थीनींनी अनुक्रमे ७६ कि व ६९ किलो वजनी गटात प्रथम क्रमांक मिळविला तसेच ओंकार पापळ याने ६६ किलो वजनी गटात द्वितीय क्रमांक मिळविला आहे. प्रेरणा जाधव व आरती तरकसे या विद्यार्थ्यीनींनी अनुक्रमे ८४ किलो व 63 किलो वजनी गटात तृतीय क्रमांक मिळविला. या यशस्वी विद्यार्थ्यांची निवड श्रीरामपूर जि.अहमदनगर येथील सी. डी. जैन महाविद्यालयात होणा-या विभागीय पाॅवरलिफ्टिंग स्पर्धेत झाली आहे.
स्पर्धेचे उद्घाटन इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे खजिनदार शैलेश शहा यांच्या हस्ते झाले तर प्रमुख पाहूणे म्हणून संस्थेचे सदस्य विलास काळोखे उपस्थित होते. यावेळी पुणे जिल्हा विभागीय क्रीडा समितीचे सहसचिव डाॅ ऋषिकेश कुंभार, शिवछत्रपती पुरस्कार विजेते प्रा. प्रतिमा लोणारी व नितीन म्हाळसकर, प्रा. डाॅ. अनिल मरे, डाॅ. शिवाजी भिंताडे, शारीरिक शिक्षण संचालक डॉ.सुरेश थरकुडे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी शैलेशभाई शहा म्हणाले की,विद्यार्थ्यांनी आनंदी आणि आरोग्यपूर्ण जीवन जगण्यासाठी खेळात भाग घेणे गरजेचे आहे. याही वयात आपण पाॅवरलिफ्टिंगचा सराव सुरू केल्याची आठवण त्यांनी विद्यार्थ्यांना यावेळी करून दिली. व्यायामासाठी वयाचा अडथळा येत नाही असा मोलाचा उपदेश विद्यार्थ्यांना शैलेश शहा यांनी दिला. विलास काळोखे यांनी खेळाडूंना स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
यशस्वी खेळाडूंचे इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे, कार्यवाह चंद्रकांत शेटे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संभाजी मलघे यांनी अभिनंदन केले. व पुढील विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
Comments
Post a Comment