वसुधैव कुटुम्बकम वर एमआयटी मध्ये आंतरराष्ट्रीय परिषद

 वसुधैव कुटुम्बकम वर एमआयटी मध्ये आंतरराष्ट्रीय परिषद

विश्वधर्मी डॉ. विश्वनाथ कराड यांच्या 82 व्या वाढदिवसानिमित्त आयोजन


आळंदी (संपादक - डॉ.संदीप गाडेकर) दि.१७ विश्वधर्मी डॉ. विश्वनाथ कराड यांच्या 82 व्या वाढदिवसानिमित्त आळंदी, पुणे येथील एमआयटी संत ज्ञानेश्वर बी. एड. कॉलेजमध्ये दि. 4 फेब्रुवारी 2023 रोजी वसुधैव कुटुम्बकम या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात येणार आहे. सदर परिषदेचे उद्घाटन हे प्रा. स्वातीताई कराड - चाटे, डॉ. संजीव सोनवणे, डॉ. विजय खरे, डॉ. दीपक माने, डॉ. आन्का लाँयना निकोलायू, डॉ. नाडा राटकोव्हीक यांच्या हस्ते होणार आहे. सदर परिषदेचा उद्देश्य आनंदी आणि शांत जगासाठी संपूर्ण विश्वात एक जग, एक कुटुंब हा विचार रुजवणे हा आहे. सदर परिषदेचे मुख्य आकर्षण म्हणजे महाराष्ट्रातील उत्कृष्ट 25 बी. एड. कॉलेजचे प्राचार्य यामध्ये सहभागी होणार आहेत.परिषदेत डॉ. ललिता वर्तक, डॉ. राधिका इनामदार, डॉ. अनिता बेलापूरकर, डॉ. बापूसाहेब चौगुले, डॉ. चंद्रकांत बोरसे, डॉ. मुकुंद पोंदे, डॉ. श्रीरंग क्षीरसागर, डॉ. रवींद्र चोभे, डॉ. वंदना नलावडे, डॉ. प्रशांत काळे, डॉ. संध्या खेडेकर, डॉ. खुशाल मुंडे, डॉ. तेजस तिडके, डॉ. सुजाता आडमुठे, डॉ. कांचन चौधरी, डॉ. संध्या चव्हाण, डॉ. राजेंद्र पाटील, डॉ. प्रवीण कोठावदे, डॉ. बी. बी. भावे, डॉ. शिवाजी देसाई, डॉ. संजय चौधरी, डॉ. अनिता धायगुडे, डॉ. सीमा दामले, डॉ. कैलास दौंडकर, डॉ. सविता सांगळे सहभागी होणार आहे.  याबरोबरच एकूण 82 प्राध्यापक, संशोधन सहभागी होऊन जागतिक नागरिकत्व, समावेशक शिक्षण, , एक विश्व एक कुटुंब याविषयावर आपले संशोधन विषय सादर करणार येणार आहे.

राज्यातील तसेच परराज्यातील अनेक मान्यवर सदर आंतरराष्ट्रीय शैक्षणिक परिषदेत सहभागी होऊन असून त्यांचे विचार ऐकण्याची सुवर्णसंधी मिळणार असल्याचे परिषदेचे समन्वयक व प्राचार्य डॉ. सुरेंद्र हेरकळ यांनी माहिती दिली आहे.

Comments

Popular posts from this blog

अपघातग्रस्त विद्यार्थिनीस मदतीचे आवाहन

राजेंद्र भोजने व उज्वला टेमगिरे यांना पीएच. डी. पदवी जाहीर

वैष्णवी लक्ष्मण मखर हिचे सी. ए. परीक्षेत घवघवीत यश