पुणे माध्यमिक शिक्षक सहकारी पतपेढी पंचवार्षिक निवडणूक

आपले विकास पॅनलच्या प्रचाराचा शुभारंभ धुमधडाक्यात संपन्न



   पुणे (प्रतिनिधी) दि 5 पुणे माध्यमिक शिक्षक सहकारी पतपेढीच्या पंचवार्षिक निवडणुकी तील आपले विकास पॅनलच्या प्रचाराचा शुभारंभ आज नूमवी मुलींच्या प्रशालेत धुमधडाक्यात पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे माजी अध्यक्ष प्राचार्य हरिश्चंद्र गायकवाड सर त्याचप्रमाणे पुणे शहर मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष सुजित जगताप, सचिव प्राचार्य शिवाजीराव कामथे, विजयराव कचरे, प्राचार्य सिन्नरकर मॅडम, शिवाजीराव खांडेकर, नरेंद्र नागपुरे यांच्या तसेच आपले विकास पॅनलचे सर्व उमेदवार, असंख्य शिक्षक सभासद बंधू भगिनींच्या उपस्थितीत नारळ वाढवून करण्यात आला.



   यावेळी आपले विकास पॅनलच्या उमेदवारांनी आपली ओळख करून देऊन येणाऱ्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये पतपेढीच्या पारदर्शक कारभारासाठी व सभासदांच्या हितासाठी पॅनल मधील सर्व उमेदवारांना कपबशीच्या चित्रावर शिक्का मारून प्रचंड बहुमताने निवडून देण्याचे आवाहन केले.

  यावेळी जेष्ठ मार्गदर्शक नरेंद्र नागपुरे, विजयराव कचरे, शिवाजीराव कामथे, महादेव माने, धोंडीबा तरटे, डॉ. कल्याण वाघ इ. उमेदवारांनी आपले मनोगत व्यक्त केले.

  आजच्या कार्यक्रमांमध्ये पुणे शहर मुख्याध्यापक संघ, पुणे शहर शिक्षकेतर संघटना, पुणे शहर टीडीएफ व पुणे शहर माध्यमिक शिक्षक संघ या सर्वांनी एक मुखाने आपले विकास पॅनलच्या उमेदवारांना पाठिंबा देऊन प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आश्वासन दिले.

    कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आपले विकास पॅनलच्या उमेदवार डॉ. मंगल शिंदे यांनी केले. कार्यक्रमाच्या प्रस्ताविकामध्ये भरेकर सरांनी पॅनेल उभे करण्या पाठीमागची पार्श्वभूमी स्पष्ट करून सभासदांच्या हितासाठी आपले विकास पॅनलच्या सर्व उमेदवारांना  प्रचंड बहुमताने निवडून देण्याचे आवाहन केले. यावेळी आपल्या विकास पॅनेलचे मुखपृष्ठ व जाहीरनाम्याचे प्रकाशन सर्व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

   यावेळी आपले विकास पॅनेलचे राज मुजावर ,दत्ता हेगडकर, बबनराव नाईक, संदीप घोलप, पुष्पक कांदळकर, सो.हर्षा पिसाळ संजय लोंढे, पुणे शहर  टीडीएफ व माध्यमिक शिक्षक संघाचे सर्व पदाधिकारी, सभासद बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

अपघातग्रस्त विद्यार्थिनीस मदतीचे आवाहन

राजेंद्र भोजने व उज्वला टेमगिरे यांना पीएच. डी. पदवी जाहीर

वैष्णवी लक्ष्मण मखर हिचे सी. ए. परीक्षेत घवघवीत यश