शाळा हे सुसंस्कृत व वैचारिक तरुण पिढी घडविणारे संस्कार केंद्र आहेत- आमदार सुनील शेळके
शाळा हे सुसंस्कृत व वैचारिक तरुण पिढी घडविणारे संस्कार केंद्र आहेत- आमदार सुनील शेळके
तळेगाव स्टेशन (संपादक-डॉ.संदीप गाडेकर) दि 3 - शाळा हे सुसंस्कृत, वैचारिक तरुण पिढी घडविणाऱ्या संस्कार केंद्र असल्याचे मत मावळचे आमदार सुनील शेळके यांनी
नवीन समर्थ विद्यालय येथे व्यक्त केले
नवीन समर्थ विद्यालय व ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्सच्या वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ नुकताच संपन्न झाला.
यावेळी प्रमुख पाहुणे मावळ तालुक्याचे आमदार सुनील आण्णा शेळके हे होते तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव संतोष खांडगे हे होते.
यावेळी नूतन संगणक कक्षाचे उद्घाटन करण्यात त्यांच्या हस्ते करण्यात आले आले तसेच स्नेहसंमेलन ध्वजारोहण नवीन समर्थ विद्यालयाचे माजी विद्यार्थी मा एडवोकेट धनंजय काटे यांच्या शुभहस्ते करण्यात आले
यावेळी नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे सचिव संतोषजी खांडगे नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक उपाध्यक्ष गणेशजी खांडगे , लायन्स क्लब ऑफ राजगुरुनगरच्या अध्यक्षा कु.अक्षदा कान्हुरकर, उद्योजक विलास काळोखे, पुणे जिल्हा कला शिक्षक संघाचे अध्यक्ष मिलिंद शेलार, लायन्स क्लब ऑफ तळेगाव दाभाडेचे अध्यक्ष मयूर राजगुरव, रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसीचे अध्यक्ष विन्सेंट सालेर, दादासाहेब उर्हे ,नगरसेविका श्रीमती संगीता ताई शेळके,रमाकांत नायडू , दामोदर शिंदे, यादवेंद्र खळदे, सोनबा गोपाळे ,चंद्रकांत शेटे , शंकर नारखेडे, शैलेश शहा ,डॉ.शाळीग्राम भंडारी संस्थेच्या सर्व शाळांचे मुख्याध्यापक, माजी शिक्षक मुख्याध्यापक इत्यादी मान्यवर उपस्थित होते
आमदार सुनील शेळके पुढे बोलताना म्हणाले नवीन समर्थ विद्यालय ही एक ऐतिहासिक वास्तू स्वातंत्र्यपूर्व काळापासून राष्ट्रीय शिक्षण देणारी शाळा या या शाळेने मला घडविले आजही वारंगवाडी, कातवी आंबी यांसारख्या भागातून सामान्य कुटुंबातून विद्यार्थी या शाळेत शिकण्यासाठी येतात सध्या तरुण पिढीमध्ये व्यसनाधीनतेचे प्रमाण वाढत आहे त्याला आळा घालण्यासाठी व भारत देशाच्या उज्वल भविष्यासाठी सुसंस्कृत पिढी तयार करण्याचे काम शिक्षक आणि शाळांवर आहे
यावेळी बोलताना संतोष खांडगे म्हणाले की,शाळा या समाज विकासासाठी नेहमीच केंद्रस्थानी राहिल्या आहेत नवीन समर्थ विद्यालय ही एक राष्ट्रीय वास्तू स्वातंत्र्यपूर्व काळात हुतात्मा क्रांतिरत्न विष्णू गणेश पिंगळे यांसारख्या विद्यार्थ्यांना घडविणारी ही शाळा आजही खेळ, स्पर्धा परीक्षा यांच्या माध्यमातून विद्यालय अग्रेसर आहे विद्यार्थ्यांची वाढती संख्या लक्षात घेता शाळेत नूतन वस्तूची गरज भासत आहे .माजी विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते ,लोकप्रतिनिधी यांच्या माध्यमातून नवीन समर्थ विद्यालयाची नूतन वास्तु लवकरच उभी राहील असा मानस असून त्यासाठी दानशूर व्यक्तींनी मदत करण्याचे आवाहन करण्यात आले.
कार्यक्रमाची प्रास्ताविक शालेय समिती अध्यक्ष महेश भाई शहा यांनी केले यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले माझा देश माझा स्वाभिमा
न हे सूत्र केंद्रस्थानी मानून संपूर्ण स्नेहसंमेलनाची रूपरेषा स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवावर आधारित होती विद्यालयातील जवळपास 195 विद्यार्थ्यांनी गायन, नृत्य, नाट्य अभिनय याद्वारे आपल्या कला सादर केल्या
न हे सूत्र केंद्रस्थानी मानून संपूर्ण स्नेहसंमेलनाची रूपरेषा स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवावर आधारित होती विद्यालयातील जवळपास 195 विद्यार्थ्यांनी गायन, नृत्य, नाट्य अभिनय याद्वारे आपल्या कला सादर केल्या
शालेय विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या निरंजन या हस्तलिखिताचे प्रकाशन नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे सचिव संतोषजी खांडगे यांच्या शुभहस्ते करण्यात आले तसेच रांगोळी, कला, विज्ञान दालनांची सुंदर उभारणी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली केली होती. मान्यवरांच्या शुभहस्ते या दालनांची उद्घाटने करण्यात आली
अक्षदा कान्हुरकर , धनंजय काटे इत्यादी मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले मान्यवरांच्या शुभहस्ते विद्यार्थ्यांना आंतरशालेय बौद्धिक व क्रीडा स्पर्धांची बक्षीस देण्यात आली
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ प्रभा काळे व सौ शारदा वाघमारे यांनी केले उपस्थित मान्यवरांचे आभार विद्यालयाचे प्राचार्य संजय वंजारे यांनी मानले
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राचार्य संजय वंजारे ,पर्यवेक्षक भाऊसाहेब आगळमे, सायन्स कॉलेज विभाग प्रमुख विजया देशपांडे ,शिक्षक प्रतिनिधी शारदा वाघमारे, श बाळासाहेब जाधव ,संमेलन प्रमुख सविता चव्हाण, सौ प्रीती गौड,प्रवीण राऊत ,सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी , विद्यार्थी प्रतिनिधी यांनी विशेष श्रम घेतले
Comments
Post a Comment