वसुधैव कुटुंबकम या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषद संपन्न

 

वसुधैव कुटुंबकम या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषद संपन्न 

शिक्षक शिक्षण क्षेत्रासाठी वसुधैव कुटुंबकम् संदेश महत्त्वपूर्ण : डॉ. दिपक माने 


आळंदी पुणे : (संपादक - डॉ.संदीप गाडेकर) येथील माईर्स, एम. आय. टी. संत ज्ञानेश्वर बी. एड. कॉलेज मध्ये विश्वधर्मी प्रा. डॉ. विश्वनाथ कराड यांच्या  82 व्या वाढदिवसाचे औचित्य साधत वसुधैव कुटुंबकम या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. सदर आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय विभागाचे संचालक डॉ. विजय खरे व डॉ. बी. बी. वाफारे यांच्या हस्ते करण्यात आले. सदर आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून दोनशेहून अधिक प्राचार्य, विभाग प्रमुख, प्राध्यापक व संशोधक सहभागी झालेले होते. सदर आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये रोमानिया, युरोप मधून  डॉ. आन्का लाँयना निकोलायू, डॉ. नाडा राटकोव्हीक हे सहभागी झाले होते.


या परिषदेत एमआयटी संत ज्ञानेश्वर महाविद्यालयातील विद्यार्थी शिक्षकांनी वसुधैव कुटुंबकम या विषयावर 12 शैक्षणिक मॉडेल तयार करून त्याचे सादरीकरण केले होते. सदर परिषदेमध्ये W20 या विषयावर एक वेगळे परिसंवाद सत्र आयोजित करण्यात आले होते ज्यामध्ये  शिक्षणशास्त्र विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. दीपक माने,डॉ. सुजाता आडमुठे, डॉ. संध्या खेडकर,डॉ. सीमा दामले, डॉ. पल्लवी वर्तक  व डॉ. प्रभा कासिवाल  यांनी सहभाग घेतला. 

सदर परिषदेतील विषयावर डॉ. श्रीरंग क्षीरसागर ( सोलापूर ) , डॉ. प्रकाश काळे (मुंबई ) , डॉ. गीता राऊत (अहमदनगर ) डॉ. अनिता बेलापूरकर (पुणे) यांनी आपले विचार मांडले. सदर परिषदेचा उद्देश्य आनंदी आणि शांत जगासाठी संपूर्ण विश्वात एक जग, एक कुटुंब हा विचार रुजवणे हा होता . सदर परिषदेचे मुख्य आकर्षण म्हणजे महाराष्ट्रातील उत्कृष्ट 25 बी. एड. कॉलेजचे प्राचार्य   डॉ. अनिता बेलापूरकर, डॉ. बापूसाहेब चौगुले, डॉ. चंद्रकांत बोरसे,  डॉ. श्रीरंग क्षीरसागर, डॉ. रवींद्र चौबे, डॉ. वंदना नलावडे, डॉ. प्रशांत काळे, डॉ. संध्या खेडेकर, डॉ. खुशाल मुंडे, डॉ. तेजस तिडके, डॉ. सुजाता आडमुठे, डॉ. संध्या चव्हाण, डॉ. राजेंद्र पाटील, डॉ. प्रवीण कोठावदे, डॉ. बी. बी. भावे, डॉ. शिवाजी देसाई, डॉ. संजय चौधरी, डॉ. अनिता धायगुडे, डॉ. सीमा दामले, डॉ. कैलास दौंडकर, डॉ. सुनीता भोरे, डॉ. हरीश कुलकर्णी, डॉ. संदीप गाडेकर, डॉ. भामरे, डॉ. दुधावडे सहभागी झाले होते.


  याबरोबरच एकूण 82 प्राध्यापक, संशोधन सहभागी होऊन जागतिक नागरिकत्व, समावेशक शिक्षण, , एक विश्व एक कुटुंब याविषयावर आपले संशोधन विषय सादर केले. यावर पुस्तिका प्रकाशित करण्यात आली. सदर परिषदेचे समन्वयक व प्राचार्य डॉ. सुरेंद्र हेरकळ यांनी सर्व मान्यनरांचा सत्कार करून आभार मानले.

प्रा. स्वातीताई कराड चाटे यांनी सदर परिषद यशस्वीपणे पूर्ण झाल्यामुळे महाविद्यालयातील प्राचार्य  डॉ.सुरेंद्र हेरकळ व प्रा. संजय शिंदे, डॉ. प्रतिभा दाभाडे, डॉ. गंगोत्री रोकडे, डॉ. विकास तुपसुंदर, डॉ. शिल्पा गावंडे, प्रा. अंगद जावळे, प्रा. दर्शना पवार, प्रा. दिशा ठाकूर, प्रा. शेखर क्षीरसागर, प्रा. संदीप गाडीलकर, श्री. रोहित वाघमारे, श्री. महावीर सोनपेठकर, श्री. सुनील कांबळे, सौ. आरती भडमुखे  व सर्व शिक्षकेतर कर्मचारी व सर्व बीएड विद्यार्थी यांचे कौतुक केले.

Comments

Popular posts from this blog

अपघातग्रस्त विद्यार्थिनीस मदतीचे आवाहन

राजेंद्र भोजने व उज्वला टेमगिरे यांना पीएच. डी. पदवी जाहीर

वैष्णवी लक्ष्मण मखर हिचे सी. ए. परीक्षेत घवघवीत यश