संघर्षाचे दुसरे नाव म्हणजे जोतिबा फुले - डॉ. प्रमोद बोराडे

 अध्यापक महाविद्यालयात महात्मा फुले जयंती उत्साहात साजरी



तळेगाव स्टेशन (वार्ताहर) दि.१७ अध्यापक महाविद्यालयात दिनांक 11 एप्रिल 2023 रोजी क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून इंद्रायणी महाविद्यालय तळेगाव दाभाडे येथील इतिहास प्रमुख व प्रसिद्ध इतिहास संशोधक डॉ. प्रमोद बोराडे सर उपस्थित होते कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्रा. डॉ. अनिता धायगुडे ह्या होत्या. डॉ. बोराडे यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांचा बालपणा पासून चा जीवनपट उलगडून महात्मा ज्योतिबा व सावित्रीबाई यांच्या जीवन कार्याची माहिती विद्यार्थ्यांना सांगितली.



सदर कार्यक्रम हा गुलमोहर गटाचे मार्गदर्शक प्राध्यापक डॉ. संदीप गाडेकर व नीलकमळ गटाच्या मार्गदर्शिका प्रा. सोनाली पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला.

यावेळी मोनिका भोपळे हिने विद्यार्थी मनोगत व्यक्त केले. कामाचे अध्यक्ष डॉ. अनिता धायगुडे यांनी महात्मा फुले यांचे कार्य या विषयी माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुमती शिंदे व शुभदा शिंदे यांनी केले तर आभार प्रदर्शन ज्योत्स्ना गुरव हिने केले.



प्रा. महादेव सांगळे ,डॉ. कविता तोटे, डॉ.शीतल देवळालकर, प्रा. ज्योती रणदिवे प्रा. सुजाता जाधव व  बी. एड. चे सर्व विद्यार्थी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

अपघातग्रस्त विद्यार्थिनीस मदतीचे आवाहन

राजेंद्र भोजने व उज्वला टेमगिरे यांना पीएच. डी. पदवी जाहीर

वैष्णवी लक्ष्मण मखर हिचे सी. ए. परीक्षेत घवघवीत यश