प्राचार्य श्री. हरिश्चंद्र गायकवाड सर यांचा सेवापूर्ती सन्मान सोहळा उत्साहात संपन्न
पुणे (प्रतिनिधी) दि. २३ आज पै. हिरामण बनकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य तसेच पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे मा.अध्यक्ष आदरणीय श्री. हरिश्चंद्र गायकवाड सर यांचा सेवापूर्ती सन्मान सोहळा शिवशंकर सभागृह, महर्षी नगर पुणे ३७ येथे संपन्न झाला.
या सन्मान सोहळा कार्यक्रमाचे अध्यक्ष महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे अध्यक्ष मा. श्री. जे.के. पाटील सर होते तसेच प्रमुख अतिथी म्हणून राज्याचे शिक्षण संचालक आदरणीय कृष्णकुमार पाटील सर, पुणे जिल्हा परिषदेच्या माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी सौ. सुनंदा वाखारे मॅडम, शिक्षणाधिकारी राक्षे सर, माजी आमदार योगेश टिळेकर, एसएससी बोर्डाच्या माजी सचिव शकुंतला काळे मॅडम, पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष मा. नंदकुमार सागर सर , मुख्याध्यापक महामंडळाचे सचिव मा. शांताराम पोखरकर सर,चंद्रकांत मोहोळ सर, मा. सचिव अरुण थोरात सर, पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे सचिव प्रसाद गायकवाड सर, शिक्षकेतर महामंडळाचे शिवाजीराव खांडेकर सर, राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे पदाधिकारी, पुणे शहर मुख्याध्यापक संघाचे पदाधिकारी तसेच शिक्षण खात्यातील अनेक आजी-माजी उपशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, वेतन विभाग अधीक्षक तसेच शहर माध्यमिक शिक्षक पतसंस्थेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सेवापुर्ती सोहळा समन्वय समितीचे समन्वयक प्राचार्य शिवाजीराव कामथे सर यांनी केले. यावेळी सर्वच मान्यवरांनी आपल्या मनोगतामध्ये गायकवाड सरांना शुभेच्छा देताना त्यांनी शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रामध्ये दिलेल्या योगदानाबद्दल आभार व्यक्त केले. तसेच उत्तम प्रशासक म्हणून त्यांची कारकीर्द अतिशय गौरवशाली राहिली याबद्दल सर्वांनीच आपले अनुभव व्यक्त करून सरांना सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी सर्व संघटनांच्या वतीने व मुख्याध्यापक संघाच्या वतीने सरांचा मानपत्र तसेच सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. मानपत्राचे वाचन मुख्याध्यापक आदरणीय बोरसे सर यांनी केले. यावेळी सरांच्या जीवनावरील चित्रफित प्रदर्शित करण्यात आली.
टीडीएफ व माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने हरिश्चंद्र गायकवाड सरांना मानपत्र,शाल, श्रीफळ,बुके तसेच विठ्ठलाची मूर्ती देऊन सपत्नीक सन्मानित करण्यात आले.
सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रामुख्याने पुणे शहर मुख्याध्यापक संघाचे सचिव आदरणीय शिवाजीराव कामथे सर अध्यक्ष सुजित जगताप सर,कनिष्ठ महाविद्यालयीन टीडीएफ चे अध्यक्ष प्रा. शशिकांत शिंदे सर, माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष सचिन दुर्गाडे सर, शहर सचिव मा. संतोष थोरात सर, पुणे शहर मुख्याध्यापक संघाचे सर्व पदाधिकारी, पुणे शहर टीडीएफचे सर्व पदाधिकारी यांनी विशेष परिश्रम घेतले.
आदरणीय शिवाजीराव कामथे सरांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय नेटके असे कार्यक्रमाचे आयोजन नियोजन करून सदर कार्यक्रम यशस्वी करण्यात आला याबद्दल माननीय शिवाजीराव कामठे सर शशिकांत शिंदे सर यांचे विशेष आभार.
त्याचप्रमाणे जेवणाची सर्व व्यवस्था पाहणारे आमचे मित्र मुख्याध्यापक आदरणीय श्री. शिळीमकर सर, स्टेज वरील सर्व व्यवस्था पाहणाऱ्या लक्ष्मणराव आपटे प्रशालेतील विद्यार्थिनी, हुजूरपागा प्रशालेतील विद्यार्थिनी, आदरणीय मुख्याध्यापिका भूमकर मॅडम, आदरणीय मुख्याध्यापिका सिन्नरकर मॅडम, सौ हर्षा पिसाळ मॅडम व सहकारी शिक्षिका आपले मोलाचे सहकार्य सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी लाभले, तसेच सर्व विषय संघटना , त्यांचे सर्व पदाधिकारी, सेवापूर्ती सोहळा समन्वय समितीचे सर्व सदस्य आपण सर्वांनी नेमून दिलेली कामगिरी अतिशय जबाबदारीने व चोख पार पाडली याबाबत आपल्या सर्वांचे मनःपूर्वक आभार.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक सचिन दुर्गाडे सर यांनी केले तर आभार भगवान पांडेकर सर यांनी मांनले. यावेळी पुणे शहर मुख्याध्यापक संघाचे आदरणीय सिन्नरकर मॅडम, माननीय शिवाजी शिंदे सर, माननीय बोरसे सर,हनुमंतराव कुबडे सर, पुणे शहर माध्यमिक शिक्षक पतसंस्थेचे अध्यक्ष विजयराव कचरे सर, पुणे शहर tdf चे उपाध्यक्ष प्राचार्य राज मुजावर सर, अंशतः अनुदानित चे अध्यक्ष अशोक धालगडे सर, सोशल मीडिया प्रमुख संतराम इंदुरे सर, द्वारकानाथ दहिफळे सर, संतोष दुर्गाडे सर,संजीव यादव सर, सुनील गिरमे सर,योगेश सोनवणे सर, संजय ढवळे सर,शशिकांत खैरे सर तसेच शहरातील विविध संघटनांचे पदाधिकारी व शिक्षक बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment