शिक्षकांचे प्रश्न प्राधान्याने सोडवा: आमदार सत्यजित तांबे
शिक्षकांचे प्रश्न प्राधान्याने सोडवा: आमदार सत्यजित तांबे
पुणे (प्रतिनिधी) दि. २५ नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार सत्यजित तांबे तसेच टीडीएफच्या पदाधिकाऱ्यांनी आज राज्याचे शिक्षण आयुक्त मा.सुरज मांढरे यांच्या समवेत शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नाविषयी बैठक घेऊन अनेक मुद्द्यावर चर्चा केली. या बैठकीस राज्याचे राज्याचे शिक्षण संचालक मा.कृष्णकांत पाटील, सहसंचालक हारून आतार, एसएससी बोर्डाच्या सचिव अनुराधा ओक,उपसंचालक वाव्हळ मॅडम उपस्थित होत्या. या बैठकीमध्ये प्रामुख्याने खालील विषयावर चर्चा करण्यात आली
1) आधार व्हॅलिडेशन मुदत वाढवण्यात यावी.
2) शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची प्रलंबित बिले तात्काळ मार्गी लावण्यात यावी.
3) वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण दरवर्षी आयोजीत करण्यात यावे.
3) मागील वर्षी वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षणासाठी शिक्षकांचे दोन हजार रुपये घेतले होते ते माघारी देण्याबाबत चर्चा करण्यात आली.
4) अनुकंपाचे प्रस्ताव तात्काळ मंजूर करण्यात यावेत.
5) पवित्र पोर्टल द्वारे लवकरात लवकर शिक्षक भरती सुरू करावी.
6) शिक्षकांच्यावर असणाऱ्या शाळाबाह्य कामांचा ताण कमी करावा.
तसेच नवीन शैक्षणिक धोरण अंमलबजावणी बाबत चर्चा करण्यात आली.
यावेळी सदर मुद्द्यावर राज्याचे शिक्षण आयुक्त सुरज मांढरे साहेब यांनी सकारात्मकता दाखवली व यावर लवकरच निर्णय घेतला जाईल असे आश्वासन दिले
यावेळी पुणे शहर टीडीएफचे अध्यक्ष व पुणे शहर मुख्याध्यापक संघाचे सचिव प्राचार्य शिवाजीराव कामथे सर, शिक्षकेतर महासंघाचे शिवाजीराव खांडेकर सर, पुणे जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन संघटनेचे अध्यक्ष संतोष फाजगे, पुणे शहर कनिष्ठ महाविद्यालय टीडीएफचे अध्यक्ष प्राध्यापक शशिकांत शिंदे, पुणे शहर tdf चे सचिव मा.संतोष थोरात तसेच पुणे, नाशिक व नगर जिल्ह्यातील टीडीएफचे पदाधिकारी व शिक्षक बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment