प्राचार्य डॉ. शिवाजी देसाई यांना महाराष्ट्र रत्न पुरस्कार


पुणे : सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटीचे, श्रीमती काशीबाई नवले शिक्षणशास्त्र महाविद्यालय लोणावळा पुणे येथील प्राचार्य डॉ. शिवाजी बाळकू देसाई यांना नुकताच अविष्कार फाऊंडेशन यांच्या वतीने शिक्षण आमदार मा. जयंतआसगावकर साहेब व प्राध्यापक किशनराव कुराडे यांच्या हस्ते ज्योतिबा रॉयल्स रिसोर्ट, कोल्हापूर येथे शेकडो मान्यवरांच्या उपस्थितीत " महाराष्ट्र रत्न पुरस्कार" प्रदान करण्यात आला.

डॉ. शिवाजी देसाई मागील २५ वर्षापासून शिक्षक शिक्षण क्षेत्रात भरीव कामगिरी करीत आहेत. तसेच मागील १३ वर्षेपासून ते सिह्गड टेकनीकन एज्युकेशन सोसायटी संस्थेत प्राचार्य पदावर कार्यरत आहेत. महाराष्ट्र रत्न पुरस्काराच्या निमित्ताने त्यांच्या कार्याचा आढावा घेण्यात आला. आजपर्यंत त्यांनी 1० पदव्या, ५ पुस्तके ,  ३ आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय पुरस्कार असून त्यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विविध समित्यांवर काम केले आहे. त्याच्या मार्गदर्शन खाली २ विध्यार्थना पीएच.डी प्राप्त झाली  तर ८ विद्यार्थी त्यांकडे पीएच.डी चे मार्गदर्शन घेत आहेत. त्यांचे २२ संशोधन पेपर हे आंतरराष्ट्रीय जनरल मध्ये प्रकाशित झाले आहेत. तसेच ६0 हून अधिक आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय चर्चासत्रात अहवाल सादर केले आहेत. शिक्षक शिक्षण क्षेत्रात तंत्रज्ञान सहायक विविध उपक्रम राबवितात. महाराष्ट्रातील विविध विद्यापीठात अभ्यास मंडळाचे ते सदस्य आहेत. एक उपक्रमशील प्राचार्य म्हणून त्यांची ख्याती आहे. विविध  सोसायटी च्या माध्यमातून विविध शैक्षणिक कार्यात व सामाजिक कार्यात  ते सहभाग घेतात.. 



त्यांच्या या भरीव कामगिरीची दखल घेत अविष्कार फाऊंडेशन यांच्या वतीने  नामांकित "महाराष्ट्र रत्न पुरस्काराने " सन्मान केला आहे. सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटीचे श्रीमती काशीबाई नवले शिक्षणशास्त्र महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थी शिक्षकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Comments

Popular posts from this blog

अपघातग्रस्त विद्यार्थिनीस मदतीचे आवाहन

राजेंद्र भोजने व उज्वला टेमगिरे यांना पीएच. डी. पदवी जाहीर

वैष्णवी लक्ष्मण मखर हिचे सी. ए. परीक्षेत घवघवीत यश