शिक्षक नेते जी.के.थोरात राज्य स्तरीय जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित:आमदार सत्यजित तांबे यांच्या हस्ते गौरव

 

शिक्षक नेते जी.के.थोरात राज्य स्तरीय जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित:आमदार सत्यजित तांबे यांच्या हस्ते गौरव



पुणे (प्रतिनिधी) दि १० टिडीएफ चे माजी शिक्षक आमदार स्व.शिवाजी दादा पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त दिला जाणारा राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार शिक्षक नेते जी.के. थोरात यांना देऊन सपत्नीक सन्मानित करण्यात आले. या पुरस्काराचे वितरण बेल्हे येथे नाशिक विभाग पदवीधर मतदार संघाचे आमदार सत्यजित तांबे यांच्या हस्ते तसेच महाराष्ट्र टीडीएफचे कार्यवाह हिरालाल पगडाल, मुख्याध्यापक महामंडळाचे रावसाहेब आवारी, राज्य टीडीएफचे विश्वस्त के.एस.ढोमसे ,अमित बेनके, जुन्नर तालुका पंचायत समिती सदस्य सुवर्णा घोडके व उदय पाटील यांच्या उपस्थितीत श्रीफळ शाल व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. जी.के.थोरात हे महाराष्ट्र राज्य शिक्षक लोकशाही आघाडीचे कार्याध्यक्ष असून सध्या ते जय हिंद विद्यालय कासुर्डी तालुका दौंड या ठिकाणी मुख्याध्यापक पदावर कार्यरत आहेत. त्यांनी तीस वर्षाच्या शैक्षणिक तसेच सामाजिक क्षेत्रातील केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल सपत्नीक जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यापूर्वी सरांना जवळपास 50 सामाजिक व शैक्षणिक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. शाळा व विद्यार्थ्यांच्या हितासाठी सरांनी नेहमीच नवनवीन उपक्रम राबवून एक आदर्श निर्माण केला आहे. विद्यार्थी गुणवत्ता वाढ व विकासासाठी नेहमी सरांचा पुढाकार असतो. त्यांच्या शाळेच्या दहावीच्या निकालाची परंपरा उज्वल असलेली दिसून येते या पाठीमागे सरांचं नियोजन व परिश्रम असल्याचे बोलले जाते. टीडीएफ संघटनेत सर क्रियाशील असून अनेक शिक्षक आंदोलनामध्ये ते अग्रभागी राहून शिक्षकांच्या समस्या सोडवण्यास त्यांनी प्राधान्य दिलेले आहे. त्याचप्रमाणे नेहमीच त्यांनी शिक्षकांच्या समस्या बाबत शासन स्तरावर पाठपुरावा करून अनेक शिक्षकांना न्याय मिळवून दिलेला आहे. सरांना पुरस्काराने सन्मानित केल्याबद्दल सर्व टीडीएफ परिवार नातेवाईक व जय हिंद माध्यमिक विद्यालय कासुर्डी सर्व सहकारी शिक्षक विद्यार्थी यांच्यामध्ये आनंदाचे वातावरण आहे.सर लेखक असून.यापूर्वीही सरांना महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्य स्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सपत्नीक गौरविण्यात आले होते. आमदार सत्यजित तांबे यांनी आपल्या मनोगतामध्ये सरांच्या कार्याचा आढावा घेऊन सरांच्या सारखा नेतृत्व कुशल माणूस मी आजवर पाहिला नाही असे गौरव उद्गार काढले. सरांनी हा पुरस्कार टीडीएफ पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत स्वीकारला सदर पुरस्कार समारंभाचे आयोजन माध्यमिक शिक्षक संघ तसेच जुन्नर तालुका शिक्षक लोकशाही आघाडीच्या वतीने करण्यात आलेले होते. यावेळी पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष वसंतराव ताकवले, पुणे जिल्हा कार्यवाह पंकज घोलप , टीडीएफचे अध्यक्ष मुरलीधर मांजरे , कार्याध्यक्ष तानाजी झेंडे, पुणे शहर टीडीएफ चे अध्यक्ष, प्राचार्य शिवाजीराव कामथे, महिलाध् अध्यक्षा स्वाती उपार, पुणे शहर माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष सचिन दुर्गाडे, कनिष्ठ महाविद्यालय टीडीएफचे सचिव, अरविंद मोडक, टीडीएफ चे उपाध्यक्ष , प्राचार्य राज मुजावर, बाबुराव दोडके, अशोक धालगडे संतराम इंदुरे व जिल्ह्यातील संख्येने शिक्षक बंधू भगिनी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

अपघातग्रस्त विद्यार्थिनीस मदतीचे आवाहन

राजेंद्र भोजने व उज्वला टेमगिरे यांना पीएच. डी. पदवी जाहीर

वैष्णवी लक्ष्मण मखर हिचे सी. ए. परीक्षेत घवघवीत यश