इंद्रायणी महाविद्यालयाच्या सिया चिमटे हिस सुवर्णपदक
इंद्रायणी महाविद्यालयाच्या सिया चिमटे हिस सुवर्णपदक
तळेगाव स्टेशन (प्रतिनिधी) दि ११ दुसऱ्या दक्षिण आशियाई कुंकू अजिंक्यपद स्पर्धा दिनांक सात आठ नऊ जून 2023 रोजी मडगाव गोवा येथे संपन्न झाल्या या स्पर्धेत इंद्रायणी महाविद्यालयाच्या द्वितीय वर्ष कला शाखेत शिकणाऱ्या सिया चिमटे हिने सुवर्णपदक मिळविले.
19 वर्ष खालील गटात 64 किलो वजन गटात सिया चिमटे हिने सुवर्णपदकाला गवसणी घातली.
कौतुक प्रसंगी इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे अध्यक्ष रामदास आप्पा काकडे म्हणाले व्यायामाने फक्त शारीरिकच नव्हे तर बौद्धिक सामाजिक भावनिक मानसीक प्रगती होत असते जी आयुष्याच्या विविध टप्प्यांवर माणसाला योग्य निर्णय घेण्यासाठी, कठीण प्रसंग कुशलतेने हाताळण्यासाठी मदत करते त्याचबरोबर विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व गुण विकसित करत असते त्यामुळे विद्यार्थ्यांनी शैक्षणिक प्रगती बरोबरच विविध खेळांमध्ये भाग घेऊन खेळामध्ये आपले करिअर घडवावे.
तिच्या या यशाबद्दल इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री रामदासअप्पा काकडे, कार्यवाह मा. चंद्रकांतजी शेटे, खजिनदार मा. शैलेश भाई शहा, प्राचार्य डॉ. संभाजी मलघे यांनी तिचे अभिनंदन केले व तिच्या पुढील क्रीडा प्रगतीसाठी शुभेच्छा दिल्या.
Comments
Post a Comment