संतोष थोरात यांचा उल्लेखनीय कामगिरी बद्दल सन्मान

संतोष थोरात यांचा उल्लेखनीय कामगिरी बद्दल सन्मान  


पुणे (प्रतिनिधी) दि. २४ पुणे शहर टीडीएफचे सचिव मा. संतोष थोरात यांना  German Language learning course मध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल  Foreign Language Online Application (FLOA) तसेच Inner Wheel Club of Pune Riverside च्या  वतीने Best Coordinator in German language या सन्मानाने ज्येष्ठ अभिनेते राहूल सोलापूरकर, डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट मुक्ती पानसे  क्लबच्या प्रेसिडेंट  माधवी चंदन मॅडम, FLOA चे समन्वयक शैलेश लेले  मुख्याध्यापक संघाचे सचिव प्राचार्य शिवाजीराव कामथे, मा. मुख्याध्यापक बोरसे या सर्वांच्या उपस्थितीत सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले.



या सन्मानाबद्दल थोरात सरांना पुणे शहर टीडीएफ व माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने आपल्या सर्व टीडीएफ परिवाराने उपस्थित राहून संघटनेच्या वतीने संविधानाची प्रत व पुस्तक भेट देऊन सन्मानित केले. यावेळी प्राचार्य शिवाजीराव कामथे,  प्राचार्य राज मुजावर , डाॅ.संदीप  गाडेकर, पुणे शहर माध्यमिक संघाचे अध्यक्ष सचिन दुर्गाडे, पुणे शहर टीडीएफचे प्रसिद्ध प्रमुख संतराम इंदुरे , पुणे शहर कनिष्ठ महाविद्यालय टीडीएफचे अध्यक्ष प्रा.शशिकांत शिंदे उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

अपघातग्रस्त विद्यार्थिनीस मदतीचे आवाहन

राजेंद्र भोजने व उज्वला टेमगिरे यांना पीएच. डी. पदवी जाहीर

वैष्णवी लक्ष्मण मखर हिचे सी. ए. परीक्षेत घवघवीत यश