प्रा. श्री मनोज किसन गायकवाड यांना पीएच. डी. पदवी प्रदान
प्रा. श्री मनोज किसन गायकवाड यांना पीएच. डी. पदवी प्रदान
तळेगाव स्टेशन (वार्ताहर) दि. १० हरकचंद रायचंद बाफना डी. एड. कॉलेजचे प्राध्यापक श्री मनोज किसन गायकवाड यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने पीएच.डी. पदवी प्रदान केली आहे. मनोज गायकवाड यांनी *"पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे जागतिकीकरणाच्या दृष्टीने व्यष्टी अध्ययन"* या विषयावर शिक्षणशास्त्र व विस्तार विभागातून संशोधन कार्य पूर्ण केले. या संशोधनासाठी त्यांना डॉ. नवनाथ तुपे यांचे मार्गदर्शन लाभले. मनोज गायकवाड यांनी पीएच. डी. प्राप्त करीत शिक्षण क्षेत्रातील सर्वोच्च शैक्षणिक पात्रता संपादन केली याबद्दल त्यांचे संस्थेचे अध्यक्ष मा. तुकाराम असवले, सचिव मा. अशोकजी बाफना सो, उपाध्यक्ष मा. बंडोबा मालपाटे यांनी अभिनंदन केले तसेच संस्थेतील सर्व प्राचार्य शिक्षक व शिक्षकेतर वर्ग, आजी माजी विद्यार्थी यांच्याकडून कौतुक होत आहे.
Comments
Post a Comment