डॉ. सुरेंद्र हेरकळ यांची दोन विद्यापीठांच्या अभ्यास मंडळावर निवड
डॉ. सुरेंद्र हेरकळ यांची दोन विद्यापीठांच्या अभ्यास मंडळावर निवड
पुणे (प्रतिनिधी) दि १७ माईर्स,एम.आय.टी. संत ज्ञानेश्वर बी. एड्. कॉलेजचे प्राचार्य डॉ. सुरेंद्र चंद्रकांत हेरकळ यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद तसेच,डॉ. पी. ए. इनामदार विद्यापीठ, पुणे येथील शिक्षणशास्त्र विषयाच्या अभ्यास मंडळावर पुढील पाच वर्षांसाठी नेमणूक करण्यात आली आहे.
डॉ. सुरेंद्र हेरकळ मागील 18 वर्षापासून शिक्षक शिक्षण क्षेत्रात भरीव कामगिरी करीत आहेत. आजपर्यंत त्यांनी विविध विषयांत अशा एकूण 16 पदव्या प्राप्त केल्या आहेत ,9 पुस्तके, 11आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय पुरस्कार त्यांना प्राप्त झालेले आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विविध समित्यांवर ते कार्यरत आहेत. त्यांचे आतापर्यंत 29 शोध निबंध आंतरराष्ट्रीय जरनलमध्ये प्रसिद्ध झालेले असून, 6 विद्यार्थी पीएचडीचे मार्गदर्शन घेत आहेत.
डॉ. सुरेंद्र हेरकळ शिक्षक-शिक्षण क्षेत्रात तंत्रज्ञान सहाय्यक विविध उपक्रम उत्कृष्ट रित्या राबवित आहेत.
सदर निवडीबद्दल संस्था, प्राध्यापक व विद्यार्थी यांनी त्यांचे अभिनंदन करत पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत . " नवीन शैक्षणिक धोरण अंमलबजावणीच्या दरम्यान सदर निवड झाल्याने अधिक भरीव कामगिरी करण्याची संधी प्राप्त झाली" ,असे विचार डॉ. सुरेंद्र हेरकळ यांनी व्यक्त केले.
Comments
Post a Comment