खडू फळा वापरून कुलगुरूंनी घेतला NEP चा वर्ग

 खडू फळा वापरून कुलगुरूंनी घेतला NEP चा वर्ग 

पुणे  (प्रतिनिधी) दि 21शिक्षण प्रसारक मंडळीच्या टिळक शिक्षण महाविद्यालयातर्फे आयोजित जे पी नाईक व्याख्यानमाला अंतर्गत यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्राध्यापक डॉ. श्री संजीवजी सोनवणे यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणि शिक्षक प्रशिक्षणासमोरील आव्हाने या विषयावर दि 20 जुलै 2023 रोजी मार्गदर्शन केले.

टिळक शिक्षण महाविद्यालयातर्फे जे पी नाईक व्याख्यानमाला अंतर्गत दर महिन्याच्या 20 तारखेला एका नामवंत शिक्षण तज्ञाचे व्याख्यान ठेवले जाते.
दिनांक २० जुलै 2023 रोजी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक चे कुलगुरू माननीय प्राध्यापक डॉक्टर श्री संजीवजी सोनवणे यांचे व्याख्यान टिळक शिक्षण महाविद्यालयाच्या वा. ना. दांडेकर सभागृह आयोजित केले होते.
आपल्या व्याख्यानात माननीय कुलगुरूंनी उच्च शिक्षणाचे बदलते स्वरूप शिक्षक प्रशिक्षणासमोरील आव्हाने अकॅडमी क्रेडिट बँक पद्धत पदवी आणि पदव्युत्तर वर्गाची रचना अशा विविध विषयावर पारंपारिक खडू फळाचा उपयोग करून मार्गदर्शन केले.
एखाद्या अस्सल शिक्षकांनी तंत्रज्ञान शिवाय आपल्या अध्यापन कौशल्याचा वापर करून राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणि शिक्षक प्रशिक्षण अशा संकीर्ण विषयावर खडू फळ्याच्या मदतीने सहज सोपा करून सांगणे, हा अद्वितीय अनुभव उपस्थितांनी अनुभवला. या व्याख्यानास सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील व्यवस्थापन मंडळाचे सदस्य, अभ्यास मंडळाचे सदस्य, विविध महाविद्यालयांची प्राचार्य, शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक- प्रशिक्षक, विद्यार्थी, शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री केशव वझे सर, अध्यक्ष महाविद्यालय विकास समिती यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून यशस्वी होण्याची चतु:सूत्री खेळातील विविध उदाहरणातून पटवून दिली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक माननीय प्राचार्य डॉ. राधिका इनामदार यांनी केले कार्यक्रमाचे संयोजन आणि सूत्रसंचालन प्राध्यापक डॉ. सुरेश इसावे यांनी केले. त्यांना व्याख्यानमाला संयोजन प्राध्यापक डॉ. दीपक चव्हाण यांचे सहकार्य लाभले. तसेच टिळक शिक्षण महाविद्यालयातील कार्यालयीन वर्ग विद्यार्थी आणि प्राध्यापक यांनी एकत्रित मिळून कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी योगदान दिले.

Comments

Popular posts from this blog

अपघातग्रस्त विद्यार्थिनीस मदतीचे आवाहन

राजेंद्र भोजने व उज्वला टेमगिरे यांना पीएच. डी. पदवी जाहीर

वैष्णवी लक्ष्मण मखर हिचे सी. ए. परीक्षेत घवघवीत यश