पुणे शहर टीडीएफ व माध्यमिक शिक्षक संघ आयोजित गुणवंत शिक्षक पुरस्कार सन्मान सोहळा उत्साहात संपन्न
पुणे शहर टीडीएफ व माध्यमिक शिक्षक संघ आयोजित गुणवंत शिक्षक पुरस्कार सन्मान सोहळा उत्साहात संपन्न
पुणे (प्रतिनिधी) दि. १७ पुणे शहर टीडीएफ व माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने आज के. जे. एज्युकेशनल इन्स्टिट्यूट,पिसोळी,बोपदेव घाट येथे गुणवंत शिक्षक सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सौ.हर्षा पिसाळ ,संपत गर्जे यांना राज्य पुरस्कार मिळाल्याबद्दल विशेष सन्मानाने सन्मानित करण्यात आले तसेच शहरातील 14 मुख्याध्यापक, 44 शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाराष्ट्राचे टीडीएफचे अध्यक्ष नानासाहेब बोरस्ते होते तर प्रमुख पाहुणे टीडीएफचे सचिव हिरालाल पगडाल,कार्याध्यक्ष जी.के. थोरात सर,के जे इन्स्टिट्यूट चे संस्थापक कल्याण जाधव, चित्रपट निर्माते राजेंद्र बरकडे, पुणे शहर कनिष्ठ महाविद्यालय टीडीएफ चे अध्यक्ष प्रा. शशिकांत शिंदे, पुणे शहर टीडीएफ कार्याध्यक्ष प्राचार्य अविनाश ताकवले, दौंड तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष प्राचार्य रामचंद्र नातू ,पुणे जिल्हा माध्य.शिक्षक संघाचे अध्यक्ष वसंतराव ताकवले, पुणे जिल्हा टीडीएफचे अध्यक्ष मुरलीधर मांजरे, पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष नंदकुमार सागर शहर संघाचे अध्यक्ष सुजित जगताप, माजी अध्यक्ष हरिश्चंद्र गायकवाड, पुणे शहर माध्यमिक पतपेढीचे अध्यक्ष श्री.विजयराव कचरे सर, प्राचार्य शिवाजी शिंदे, अशोक नाळे व मान्यवर उपस्थित होते. यावेळी सर्व मान्यवरांचा संघटनेच्या वतीने शाल श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात लक्ष्मणराव आपटे प्रशालेतील विद्यार्थ्यांनी मान्यवरांच्या औक्षणाने,द्वीप प्रचलन करून झाली.सर्वांचे स्वागत ईशस्तवनाने करण्यात आले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रास्ताविक पुणे शहर टीडीएफ अध्यक्ष प्राचार्य शिवाजीराव कामथे सर यांनी करून कार्यक्रमाच्या आयोजन नियोजन तसेच पुणे शहर टीडीएफ च्या कार्याविषयी माहीती दिली.सर्व पाहुण्यांची ओळख व सन्मान माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष सचिन दुर्गाडे यांनी करून दिली.
यावेळी प्रा. संतोष थोरात व डॉ. संदीप गाडेकर लिखित POETRY AND FIGURES OF SPEECH या पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. मान्यवरांच्या मनोगत मध्ये राज्य टीडीएफचे कार्याध्यक्ष जी. के थोरात सर यांनी संघटनेचे महत्त्व पठवून देऊन, येणाऱ्या काळामध्ये सरकारी धोरणांचा शिक्षक व शिक्षण क्षेत्रावर काय परिणाम होऊ शकतो याबाबत मार्गदर्शन केले. महाराष्ट्र राज्य टीडीएफचे सचिव पगडाल सर यांनी सुंदर अशा पुरस्कार सन्मान सोहळ्याच्या आयोजनाबद्दल टीडीएफच्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून सरकारी स्तरावर माध्यमिक शिक्षकांसाठी असा कार्यक्रम आयोजन होणे गरजेचे आहे, सर्व शिक्षकांनी एकजूट होऊन संघटनेमध्ये येऊन सरकारी धोरणांना विरोध करणे गरजेचे आहे असे मत व्यक्त केले. अध्यक्षीय भाषणामध्ये नानासाहेब बोरस्ते यांनी शिक्षक व शिक्षकांच्या प्रश्नाबाबत सरकार उदासीन असून येणाऱ्या काळामध्ये एकजूट होणं आवश्यक आहे असे मत व्यक्त केले
पुरस्कारार्थीच्या वतीने राज्य पुरस्कार विजेते संपत गर्जे, लक्ष्मणराव आपटे प्रशालेच्या मुख्याध्यापिका मेधा सिन्नरकर यांनी आपले मनोगत व्यक्त करून अशा कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल आभार व्यक्त केले.
यावेळी टीडीएफ व माध्यमिक शिक्षक संघाच्या नवीन त्रैवार्षिक कार्यकारणीच्या पदाधिकाऱ्यांची नियुक्तीपत्रे अधिकाऱ्यांच्या हस्ते वितरित करण्यात आली पुणे शहर टीडीएफचे अध्यक्षपदी प्राध्यापक संतोष थोरात, सचिव पदी बाबुराव दोडके, कार्याध्यक्षपदी भगवान पांडेकर, पुणे शहर माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्षपदी प्राचार्य राज मुजावर, सचिव धोंडीबा तरटे, कार्याध्यक्ष अशोक धालगडे, महिला टीडीएफच्या अध्यक्षपदी हर्षा पिसाळ, माध्यमिक शिक्षिका संघाच्या अध्यक्षपदी भारती राऊत सचिव पदी डॉ. मंगल शिंदे, विनाअनुदान संघटनेच्या अध्यक्षपदी संजय कांबळे , सचिव पदी वर्षा गायकवाड यांना निवडीची पत्रे देण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. मंगल शिंदे, संतोष थोरात, संतोष दुर्गाडे यांनी केले तर आभार प्राचार्य राज मुजावर यांनी मानले. शेवटी पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी पुणे शहर टीडीएफ व माध्यमिक शिक्षक संघाच्या सर्वच पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले यामध्ये प्रामुख्याने प्राचार्य शिवाजीराव कामथे, कनिष्ठ महाविद्यालय tdf चे अध्यक्ष प्रा.शशिकांत शिंदे, सचिव अरविंद मोडक, कोथरूड विभाग प्रमुख बाबुराव दोडके, भगवान पांडेकर, वडगाव शेरी विभाग प्रमुख द्वारकानाथ दहिफळे, सोशल मीडिया प्रमुख संतराम इंदुरे , अंशतः अनुदान व विनाअनुदानित संघटनेचे अध्यक्ष अशोक धालगडे , सुनील गिरमे, संजय पिंगळे, संजय कांबळे, आनंद भिकुले, दीपक खैरे, स्वाती लिमन, रेश्मा यादव, वर्षा गायकवाड, भारती राऊत ,डॉ. उज्वला हातागळे, विद्याताई पवार,सुधीर थोरात, बाळासाहेब इमडे या सर्वांनी विशेष प्रयत्न केले.
Comments
Post a Comment