ऋषिपंचमी निमित्त सामूहिक अथर्वशीर्ष पठण

 ऋषिपंचमी निमित्त सामूहिक अथर्वशीर्ष पठण



तळेगाव स्टेशन (वार्ताहर)

ऋषिपंचमी निमित्त सामूहिक अथर्वशीर्ष पठण

    श्री डोळसनाथ नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित  व श्री गणेश तरुण मंडळ (मानाचा पाचवा गणपती) यांच्या सयुक्त विद्यमाने ऋषिपंचमी निमित्त सामूहिक महिला अथर्वशीर्ष पठणा चा कार्यक्रम आज दिनांक २०/०९/२०२३ रोजी सकाळी ७.३० वाजता स्व.कासाबाई भेगडे सभागृह येथे भक्तिमय वातावरणात पार पडला.  गेली १० वर्ष ऋषिपंचमी ला  अथर्वशीर्ष पठण कार्यक्रमाचे आयोजन केले


जात आहे. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी महिलांचा उत्साह व सहभाग वाढलेला दिसून येत होता.

 यशस्वी झालेल्या चंद्रयान - ३ मोहिमेची प्रतिकृती पाहून प्रत्येकाला कौतुक वाटत होते. एकूण २२३० महिलांची उपस्थिती होती. अथर्वशीर्ष ११ आवर्तने पठण होत असतांना संथेचे अध्यक्ष राहुल पारगे व सौ मनिषा राहूल पारगे यांनी सपत्नीक श्रीगणेश मूर्तीला अभिषेक केला. कार्यक्रमास पतसंथेचे आधारस्तंभ संतोष भेगडे, अध्यक्ष राहुल पारगे तसेच संचालक शरद भोंगाडे, समीर भेगडे, सचिव अतुल राऊत, अमित भसे, श्रीकांत मेडी, संचालिका सौ मेघा भेगडे, आरती राऊत,प्रतिक मेहता,संध्या देसाई, नूतन भेगडे, श्वेता भोंगाडे व पतसंथेतील सर्व कर्मचारी  तसेच पतसंथेचे सल्लागार डॉ भंडारी , महेशभाई शहा, विलास भेगडे, दिलीप शहा, माजी नरसेविका मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्री संतोष भेगडे यांनी सर्व उपस्थित महिलाना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या तसेच संथेच्या विविध योजनांची माहिती दिली.तसेच संस्थेचे सल्लागार  डॉ भंडारी   यांनी गायत्री  मंत्राचे महत्व सांगून आपल्या आयुष्यातील काही महत्वाचे अनुभव सांगितले.  उपस्थित सर्व महिलांना पतसंथेते तर्फे एक भेटवस्तू व फराळ चिवडा वाटप करण्यात आला. 

     आभार प्रदर्शनसंस्थेचे सचिव श्री अतुल राऊत यांनी केले.  तसेच कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता श्री गणेश तरुण मंडळाचे कार्यकर्ते व श्री डोळसनाथ पतसंस्थेचे कर्मचारी वृंद यांनी घेतलेल्या परिश्रमबद्दल सर्वांनी कौतुक केले.

Comments

Popular posts from this blog

अपघातग्रस्त विद्यार्थिनीस मदतीचे आवाहन

राजेंद्र भोजने व उज्वला टेमगिरे यांना पीएच. डी. पदवी जाहीर

वैष्णवी लक्ष्मण मखर हिचे सी. ए. परीक्षेत घवघवीत यश