पुणे शहर टीडीएफ व माध्यमिक शिक्षक संघाच्या अध्यक्षपदी अनुक्रमे प्रा. संतोष थोरात व प्राचार्य राज मुजावर यांची बिनविरोध निवड
पुणे शहर टीडीएफ व माध्यमिक शिक्षक संघाच्या अध्यक्षपदी अनुक्रमे प्रा. संतोष थोरात व प्राचार्य राज मुजावर यांची बिनविरोध निवड
पुणे (प्रतिनिधी) दि. १७ पुणे शहर व माध्यमिक शिक्षक संघाच्या त्रैवार्षिक पदाधिकाऱ्यांची निवड नुकतीच महाराष्ट्र राज्य टीडीएफच्या राज्यपदाधिकाऱ्यांच्या उपस्थित करण्यात आली. यावेळी पुणे पुणे शहर टीडीएफच्या अध्यक्षपदी प्रा. संतोष थोरात तर माध्यमिक शिक्षक शिक्षकांच्या अध्यक्षपदी प्राचार्य राज मुजावर तसेच इतर पदाधिकाऱ्यांच्या निवडीची पत्रे महाराष्ट्र राज्य टीडीएफचे अध्यक्ष,नाशिक विभाग शिक्षक मतदार संघाचे माजी आमदार नानासाहेब बोरस्ते,राज्य टीडीएफचे सचिव हिरालाल पगडलाल, कार्याध्यक्ष जी. के. थोरात यांच्या हस्ते सर्व पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रे देण्यात आली.
यावेळी प्रा.संतोष थोरात व प्राचार्य राज मुजावर यांनी संघटनात्मक बांधणीसाठी प्रयत्न करणार असल्याचे तसेच शिक्षकांच्या समस्या बाबत शासन स्तरावर पाठपुरावा करून शिक्षकांच्या न्याय हक्कासाठी कायम तत्पर राहण्याचे आश्वासन दिले.
यावेळी पुणे शहर टीडीएफचे अध्यक्ष प्राचार्य शिवाजीराव कामथे ,माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष सचिन दुर्गाडे ,कनिष्ठ महाविद्यालय टीडीएफचे अध्यक्ष प्रा. शशिकांत शिंदे ,सचिव अरविंद मोडक महिला अध्यक्षा डॉ.उज्वल हातागळे, विद्याताई पवार ,विनाअनुदान संघटनेचे अध्यक्ष अशोक धालगडे, सोशल मीडिया प्रमुख संतराम इंदोरे, पुणे जिल्हा वरिष्ठ महाविद्यालय टीडीएफ चे अध्यक्ष डॉ. संदीप गाडेकर तसेच टीडीएफ व माध्यमिक शिक्षक संघाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देण्यात आल्या.
पदाधिकारी पुढील प्रमाणे
पुणे शहर टीडीएफ
अध्यक्ष- प्राध्यापक संतोष थोरात
कार्यवाह- बाबुराव दोडके
कार्याध्यक्ष- भगवान पांडेकर
माध्यमिक शिक्षक संघ
अध्यक्ष- प्राचार्य राजमुजावर
कार्यवाह- धोंडीबा तरटे
कार्याध्यक्ष- अशोक धालगडे
पुणे शहर महिला टीडीएफ
अध्यक्षा- सौ हर्षा पिसाळ
कार्यवाह- डॉ.उज्वला हातागळे
माध्यमिक शिक्षिका संघ
अध्यक्ष- सौ भारती राऊत
कार्यवाह- डॉ.मंगल शिंदे
विनाअनुदानित व अंशतः अनुदानित टीडीएफ
अध्यक्ष- संजय कांबळे
कार्यवाह- वर्षा गायकवाड
कार्याध्यक्ष- बाळासाहेब इमडे.
Comments
Post a Comment