सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या शिक्षणशास्त्र व विस्तार विभागाकडून पीएच. डी.कोर्स वर्कचा शुभारंभ

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या शिक्षणशास्त्र व विस्तार विभागाकडून पीएच. डी.कोर्स वर्कचा शुभारंभ

पुणे (प्रतिनिधी) दि. १९  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाच्या शिक्षणशास्त्र व विस्तार विभागाकडून पीएच. डी.कोर्स वर्कचा शुभारंभ करण्यात आला सदर कार्यक्रमास पुणे,नगर,नाशिकचे 135 हून अधिक संशोधक उपस्थित होते.प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.एच एन जगताप सर उपस्थित होते व तसेच प्र कुलगुरू प्रो.पराग काळकर सर, व्यवस्थापन समिती सदस्य रवींद्र शिणगापूरकर सर, शिक्षणशास्त्र प्रशाळेचे संचालक प्रा. विलास आढाव उपस्थित होते. सदर कार्यक्रम हा दोन सदरामध्ये पार पडला त्यातील प्रथम सदरामध्ये डॉ. जगताप सर यांनी मार्गदर्शनामध्ये एक आदर्श शिक्षक कसा असावा शिक्षकानी खऱ्या शिक्षणाची मूल्ये कशी जपली पाहिजे व संशोधनाची गरज याबाबतीत अनमोल असे सहज सोप्या व आपल्या ओघवत्या वाणीने नेहमीप्रमाणे शिक्षणाचा उपयोग हा आपले विद्यार्थी व समाजातील तळागाळातील घटक यांच्यासाठी व्हावा व हे पटवून देण्यासाठी शालेय व्यवस्थापनातील अतिशय सोपी व समर्पक उदाहरणे दिली. व पुढील पीएच.डी. अभ्यासक्रमासाठी सर्वांना शुभेच्छा दिल्या नंतर प्र.कुलगुरू प्रा.पराग काळकर सरांनी  संशोधनातील नाविन्यपूर्णता याविषयी संशोधक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. स्कूल ऑफ एज्युकेशनचे डायरेक्टर डॉ. विलास आढाव सर यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच व्यवस्थापन समितीचे सदस्य माननीय रवींद्र शिंगणापूरकर सरानी  संशोधनाची उपयुक्तता याविषयी मोलाचे मार्गदर्शन केले.

पीएच.डी. कोर्स वरच्या दुसऱ्या सदरामध्ये शिक्षण शास्त्र व विस्तार विभागाचे प्रमुख डॉ. गीता शिंदे मॅडम व पुणे विद्यापीठाच्या संलग्निकृत पीएच.डी. संशोधन सेंटर चे प्रमुख निर्मलाताई थोपटे  शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या प्राचार्य  डॉ.संध्या चव्हाण मॅडम, आझम कॉलेजच्या प्राचार्य डॉ.अनिता बेलापूरकर , डॉ.माधुरी यादव ,पुणे विद्यापीठाच्या कौशल्य विभागाच्या डॉ.अंजली जगताप , प्रतिभा कॉलेजच्या डॉ.सुवर्णा गायकवाड ,  ज्ञानगंगा कॉलेज ऑफ एज्युकेशनचे डॉ.श्याम रणदिवे ,पुणे विद्यापीठाच्या शिक्षणशास्त्र विभागाच्या आदरणीय डॉ.सर्व प्राध्यापक व शिक्षण शास्त्र विभागाशी associate पीएचडी गाईड यांनी संवादद्वारे संशोधक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले सदर सदरामध्ये डॉक्टर गीता शिंदे मॅडम यांनी सदर कोर्स ची रुपरेषा समजावून सांगितली व विद्यार्थ्यांना येणाऱ्या अनेक अडचणीचे निरसन केले

तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कोर्स कोऑर्डिनेटर डॉ. गायत्री चौकडे यांनी केले व आभार प्रदर्शन सारिका तोरावने केले.

Comments

Popular posts from this blog

अपघातग्रस्त विद्यार्थिनीस मदतीचे आवाहन

राजेंद्र भोजने व उज्वला टेमगिरे यांना पीएच. डी. पदवी जाहीर

वैष्णवी लक्ष्मण मखर हिचे सी. ए. परीक्षेत घवघवीत यश