भविष्यामध्ये शिक्षकांनी आपल्या हक्कांसाठी संघटित होणे गरजेचे: माजी शिक्षक आमदार नानासाहेब बोरस्ते

 भविष्यामध्ये शिक्षकांनी आपल्या हक्कांसाठी संघटित होणे गरजेचे: माजी शिक्षक आमदार नानासाहेब बोरस्ते



पुणे (प्रतिनिधी)18 सप्टेंबर 2023

शासन शिक्षण व शिक्षणाच्या बाबतीमध्ये उदासीन असून भविष्य काळामध्ये दोन्ही क्षेत्र वाचवण्यासाठी सर्व शिक्षकांनी संघटित होणं काळाची गरज असल्याचे मत नाशिक विभाग शिक्षक मतदार संघाचे माजी आमदार नानासाहेब बोरस्ते यांनी  मत व्यक्त केले. पुणे शहर टीडीएफ व माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने के.जे.एज्युकेशनल इन्स्टिट्यूट पिसोळी येथे आयोजित गुणवंत शिक्षक सन्मान व पुस्तक प्रकाशन सोहळ्याच्या अध्यक्षीय भाषणामध्ये ते बोलत होते. पुणे शहर टीडीएफ व माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने शहरातील राज्य पुरस्कार प्राप्त  सौ.हर्षा पिसाळ व संपत गर्जे या शिक्षकांचा विशेष सन्मान देऊन तसेच 14 मुख्याध्यापक व 44 शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन  मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यावेळी प्रा.संतोष थोरात व डॉ.संदीप गाडेकर लिखित पोएट्री अँड फिगर्स ऑफ स्पीच या  पुस्तकाचे प्रकाशनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा टीडीएफ चे अध्यक्ष मुरलीधर मांजरे माध्यमिकचे अध्यक्ष वसंतराव ताकवले, के.जे.एज्युकेशनल इन्स्टिट्यूट चे संस्थापक  कल्याण जाधव, प्राचार्य अविनाश ताकवले, चित्रपट निर्माते राजेंद्र बरकडे, पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष नंदकुमार सागर  माजी अध्यक्ष हरिश्चंद्र गायकवाड, प्राचार्य शिवाजी शिंदे, दौंड तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष रामचंद्र नातू, सुनील ताकवले उपस्थित होते.

 महाराष्ट्र राज्याचे कार्याध्यक्ष जी.के. थोरात यांनी शासन कुठल्याही प्रकारचा पुरस्कार माध्यमिक शिक्षकांना देत नसून संघटनेच्या माध्यमातून शिक्षकांचा गौरव केला जातो ही आनंदाची गोष्ट आहे तसेच भविष्यामध्ये सर्व शिक्षकांनी संघटनेमध्ये येऊन आपल्या समस्यांसाठी एकजूट दाखवणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. राज्याचे सचिव हिरालाल पगडाल यांनी सदर सन्मान सोहळ्याच्या आयोजनाबाबत आयोजकांचे अभिनंदन करून भविष्यामध्ये संघटनेच्या माध्यमातून आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी लढा देण्याचे आवाहन  करून सर्वांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी पुणे शहर टीडीएफ व माध्यमिक शिक्षक संघाच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना राज्य टीडीएफ च्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन सन्मान करण्यात आला.

  कार्यक्रमाचे प्रास्ताविक टीडीएफ चे अध्यक्ष प्राचार्य शिवाजीराव कामथे यांनी केले तर पाहुण्यांची ओळख व सन्मान माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष सचिन दुर्गाडे यांनी करून दिली.

 कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष थोरात डॉ.रमंगल शिंदे, संतोष दुर्गाडे यांनी केले. तर उपस्थितांचे आभार प्राचार्य राज मुजावर यांनी मानले

 सर्वात जास्त कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सोशल मीडिया प्रमुख संतराम इंदुरे, विनाअनुदान चे अध्यक्ष अशोक धालगडे, भगवान पांडेकर, बाबुराव दोडके, उज्वला हातागळे, सुनील गिरमे, प्रीतम बर्गे ,आनंद भिकुले, विद्याताई पवार, रेश्मा यादव, स्वाती लिमन, सुधीर थोरात यांनी  विशेष परिश्रम घेतले तसेच लक्ष्मणराव आपटे प्रशालेतील विद्यार्थ्यांचेमोलाचं सहकार्य लाभले.

Comments

Popular posts from this blog

अपघातग्रस्त विद्यार्थिनीस मदतीचे आवाहन

राजेंद्र भोजने व उज्वला टेमगिरे यांना पीएच. डी. पदवी जाहीर

वैष्णवी लक्ष्मण मखर हिचे सी. ए. परीक्षेत घवघवीत यश