वन्यजीव रक्षक मावळ कडून तस्कर जातीच्या सापाच्या पिलांना जीवनदान

 वन्यजीव रक्षक मावळ कडून तस्कर जातीच्या सापाच्या पिलांना जीवनदान



तळेगाव स्टेशन (डॉ. संदीप गाडेकर) दि.१९  

जगद्गुरु संत श्री. तुकाराम महाराजांच्या ओवी प्रमाणे  

लाभले भाग्य वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे। 

पक्षी ही सुस्वरे आळविती।। धृ ।।

 येण सुखे रुचे एकांताचा वास। नाही गुणदोष अंगा येत !!

या प्रमाणेच येथील वन्यजीव रक्षक मावळ चे सर्पमित्र भास्कर माळी  यांना  22 जुलै रोजी विद्याताई काशीद यांनी फोन केला की आमच्या येथे एक साप आहे पण त्यांनी काहीतरी खाल्ले आहे व तो एका जागेवर असून हालत नाही त्या क्षणी  भास्कर माळी यांनी अविनाश कारले यांना त्या ठिकाणी पाठवले असता तो तस्कर जातीचा बिनविषारी साप आहे हे सांगितले व ताईंना तो साप अंडी देत असताना दिसला त्यामुळे त्याला तसेच ठेवले दुसऱ्या दिवशी सकाळी सापाने पूर्णपणे नऊ अंडी दिली होती  नंतर वन्य जीवरक्षक द्वारे त्या सापास नैसर्गिक अधिवासामध्ये सोडण्यात आले व ती अंडी वन्य जीवरक्षक टीम ने निगराणी मध्ये संस्थेचे अध्यक्ष निलेश गराडे व वन विभागाच्या मार्फत एका विशिष्ट टेंपरेचर मध्ये मेंटेन केली.

 

त्यांच्यावर रोज देखरेख ठेवली असता 78 दिवसांनी म्हणजेच दिनांक १८ रोजी त्या अंड्यांमधून ९ पिल्ले बाहेर आली व त्यांना वन्य जीवरक्षक व विद्याताई काशीद तसेच सर्पमित्र अविनाश कारले, भास्कर माळी मामा सुरज गोबी व वैभव वाघ यांनी मिळून त्यांची योग्य ती निगरानी ठेवली व सर्व पिल्ले व्यवस्थित असल्याची खात्री करून त्या पिलांना नैसर्गिक अधिवासामध्ये मुक्त केले.

Comments

Popular posts from this blog

अपघातग्रस्त विद्यार्थिनीस मदतीचे आवाहन

राजेंद्र भोजने व उज्वला टेमगिरे यांना पीएच. डी. पदवी जाहीर

वैष्णवी लक्ष्मण मखर हिचे सी. ए. परीक्षेत घवघवीत यश