रामराज्य विद्यालयातील कलाशिक्षक संजय सोनवणे जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मानित

 रामराज्य विद्यालयातील कलाशिक्षक संजय सोनवणे जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मानित



कोरेगाव भीमा (प्रतिनिधी)  दि.22 ऑक्टो.2023

माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संस्था शिरूर हवेली यांच्यावतीने पुणे जिल्ह्यातील शैक्षणिक,सामाजिक, कृषी, पर्यावरण  तसेच वैद्यकीय क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या जिल्ह्यातील 45 मान्यवरांना जिल्हास्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी *रामराज्य माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थीप्रिय कलाशिक्षक श्री.संजय सोनवणे यांना

 कला शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल गुणवंत कलाशिक्षक पुरस्कार मा. किसनराव पलांडे,अवर सचिव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते तसेच हारुण आतार साहेब, सहसंचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य, डॉ.गणपत मोरे विभागीय उपसंचालक लातूर विभाग, सौ सुनंदा वाखारे मॅडम शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद पुणे , जी.के.थोरात कार्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य शिक्षक लोकशाही आघाडी,मा.नंदकुमार सागर अध्यक्ष पुणे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघ, मा.शिवाजीराव कामथे, सचिव  पुणे शहर मुख्याध्यापक संघ, मा. सोमनाथ भंडारे, अध्यक्ष माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संस्था शिरूर हवेली यांच्या प्रमुख उपस्थितीत शाल, श्रीफळ,सन्मानचिन्ह व पुस्तक भेट देऊन, सन्मानित करण्यात आले* श्री. संजय सोनवणे हे गेली 20 वर्षापासून रामराज्य विद्यालयामध्ये शिक्षक असून त्यांनी एलिमेंट्री आणि इंटरमिजिएट या परीक्षेमध्ये हजारो विद्यार्थी यशस्वी केलेले आहेत तसेच शाळेच्या शैक्षणिक व सामाजिक विकासामध्ये विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासामध्ये त्यांनी मोलाची भूमिका बजावलेली असून त्यांच्या कार्याची दखल घेऊन हा  सन्मान केल्याचे मत रामराज्य माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य शिवाजीराव कामथे यांनी व्यक्त केले.


यावेळी जी.के.थोरात यांनी आपल्या मनोगतामध्ये  काही प्रमाणात सरकारची धोरणे चांगली असून चुकीच्या धोरणा विरोधात नक्कीच संघटनेच्या वतीने आवाज उठवला जाईल व चांगल्या धोरणांसाठी सरकारला सहकार्य केले जाईल असे  मत व्यक्त केले. राज्याचे शिक्षण सहसंचालक मा. हारून आतार यांनी समूहशाळा ही वीस पटापेक्षा कमी विद्यार्थी संख्या असणाऱ्या शाळांसाठी एक काळाची गरज असून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी सरकारने उचललेले  हे चांगलं पाऊल असून यामधून कुठल्याही शिक्षकांच्या नोकऱ्या जाणार नाहीत किंवा कोणत्याही शाळा बंद करण्याचा सरकारचा विचार नसल्याबाबत स्पष्ट केले तसेच विद्यार्थ्यांच्या मध्ये खेळ आणि वाचनाची आवड लागण्यासाठी शिक्षकांनी प्रयत्न करण्याचे आवाहन करून  पुरस्कार प्राप्त मान्यवरांना शुभेच्छा देऊन त्यांचे अभिनंदन केले.

 सदर पुरस्कार मा. संजय सोनवणे सर यांनी आपल्या प्रशालेतील सर्व सहकाऱ्यांच्या समवेत आपल्या कुटुंबीयांसोबत स्वीकारला म.यावेळी पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष वसंतराव ताकवले,पुणे जिल्हा टीडीएफ चे अध्यक्ष मुरलीधर मांजरे,कार्याध्यक्ष तानाजी झेंडे, मुंबई सेकंडरी पतसंस्थेचे संचालक मा.सुधाकर जगदाळे पुणे शहर कनिष्ठ महाविद्यालय टीडीएफ चे अध्यक्ष प्रा. शशिकांत शिंदे,माध्यमिक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष संजय ढवळे, पुणे शहर टीडीएफ चे अध्यक्ष प्रा. संतोष थोरात तसेच जिल्ह्यातील मुख्याध्यापक, शिक्षक, टीडीएफ व माध्यमिक शिक्षक संघाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल संजय सोनवणे यांचे, संस्थाचालक, मुख्याध्यापक म,सहकारी शिक्षक व पालक यांनी अभिनंदन केले असून परिसरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Comments

Popular posts from this blog

अपघातग्रस्त विद्यार्थिनीस मदतीचे आवाहन

राजेंद्र भोजने व उज्वला टेमगिरे यांना पीएच. डी. पदवी जाहीर

वैष्णवी लक्ष्मण मखर हिचे सी. ए. परीक्षेत घवघवीत यश