एम. आय. टी. बी. एड. कॉलेज ने राबविला नाविन्यपूर्ण उपक्रम

 एम. आय. टी. बी. एड. कॉलेज ने राबविला नाविन्यपूर्ण उपक्रम 



तळेगाव दाभाडे (संपादक - डॉ.संदीप गाडेकर) दि. 30 माईर्स, संत ज्ञानेश्वर बी. एड कॉलेज, आळंदी, पुणे यांच्या वतीने भीमाशंकर येथील भोरगिरी या गावातील शैक्षणिक सुविधा पासून वंचित असलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षणाची ज्ञानगंगा पोहोचविण्यासाठी महात्मा फुले यांनी सुचविलेल्या पाझर सिद्धांताला अनुसरून समाजातील तळागाळातील लोकांपर्यंत शिक्षण हे पोहोचलं पाहिजे या उद्देशाने "प्रोजेक्ट पर्क्युलेशन एज्युटॅक १.०" या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमामध्ये प्राचार्य डॉ. सुरेंद्र हेरकळ यांच्या नेतृत्वामध्ये महाविद्यालयातील प्राध्यापक आणि विद्यार्थी - शिक्षक यांनी भीमाशंकर येथील भोरगिरी या गावांमध्ये जाऊन पाढ्या वस्त्यातील जवळजवळ १०० विद्यार्थ्यांना एकत्रित करून त्यांना शैक्षणिक सुविधा पुरवण्यासाठी दप्तर, पुस्तके, वह्या, पेन ,पेन्सिल आणि रंग हे वर्षभर लागणारे साहित्य देण्यात आले. यामध्ये भोरगिरी येथील सरपंच, ग्रामस्थ यांनी सहभाग घेतला. 



हा उपक्रम राबविण्यासाठी कल्पवृक्ष संस्थेचे श्री प्रदीप चव्हाण यांनी मोलाचे सहकार्य केले. भोरगिरी येथील महिला बचत गटाच्या वतीने आलेल्या सर्व प्राध्यापक, विद्यार्थी - शिक्षकांचे स्वागत करण्यात आले व त्यांची भोजनाची सुद्धा व्यवस्था करण्यात आली. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना आदिवासी जनजीवन, संस्कृती आणि भातशेती याची ओळख गावकऱ्यांनी करून दिली. विद्यार्थी - शिक्षकांमध्ये आणि प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये एक अनोखे नाते निर्माण झाले, यामुळे पुढील वर्षभर संपर्कात राहून विद्यार्थ्यांना ऑनलाइनच्या माध्यमातून शैक्षणिक धडे देण्याचे काम आळंदी येथील एम. आय. टी. बी. एड. महाविद्यालयाकडून करण्यात येणार आहे. या उपक्रमाबाबत पुणे जिल्ह्याच्या शिक्षणाधिकारी माननीय सौ. संध्या गायकवाड यांनी प्राचार्य व सर्व विद्यार्थी- शिक्षकांचे कौतुक केले. त्याचबरोबर या उपक्रमासाठी एम. आय. टी. संस्थेच्या सहसचिव प्रा. स्वातीताई कराड यांनी अभिनंदन केले आणि  आर्थिक सहकार्य केले. अशा प्रकारचे नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यासाठी महाविद्यालयाच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येते असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुरेंद्र हेरकळ यांनी दिली.

Comments

Popular posts from this blog

अपघातग्रस्त विद्यार्थिनीस मदतीचे आवाहन

राजेंद्र भोजने व उज्वला टेमगिरे यांना पीएच. डी. पदवी जाहीर

वैष्णवी लक्ष्मण मखर हिचे सी. ए. परीक्षेत घवघवीत यश