इनरव्हील क्लब ऑफ तळेगांव दाभाडेच्या अध्यक्षा संध्या थोरात यांनी जिल्हा परिषद शाळा, विठ्ठलवाडी, सोमाटणे घेतली दत्तक

 इनरव्हील क्लब ऑफ तळेगांव दाभाडेच्या अध्यक्षा संध्या थोरात यांनी जिल्हा परिषद शाळा, विठ्ठलवाडी, सोमाटणे घेतली दत्तक



तळेगांव स्टेशन (डॉ.संदीप गाडेकर) दि. १९ जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना अनेक गैरसोयी आणि असुविधांना तोंड द्यावे लागते. त्यामुळे विद्यार्थी संख्या रोडावते. कष्टकरी समाजातील विद्यार्थ्यांना पैशा अभावी खाजगी शाळेत प्रवेश घेता येत नाही. अशीच ८० पटसंख्या असलेली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा विठ्ठलवाडी सोमाटणे . इयत्ता पहिली ते चौथीची मुले इथे शिक्षण घेतात. मोल मजुरी करणाऱ्या पालकांची ही मुले.  मुलांच्या अंगात ताप असला तरी पालक त्यांना शाळेत सोडून कामावर जातात अशी अवस्था. त्यांच्यासाठी साध्या वह्या, कंपास बॉक्स, दप्तरे घेणेही पालकांना शक्य होत नाही. इनर व्हील क्लब ऑफ तळेगांव दाभाडेच्या अध्यक्षा संध्या थोरात यांनी मावळातील अनेक शाळांचा सर्व्हे करून या शाळेला दत्तक घेऊन हॅप्पी स्कूल प्रोजेक्टसाठी निवडले. 

गेले तीन ते चार महिने या शाळेवर काम चालू होते.  असंख्य देणगीदारांच्या मदतीने शाळेत सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या. विद्यार्थ्यांना प्यायला शुद्घ पाणी मिळावे म्हणून वॉटर प्युरिफायर, लायब्ररीसाठी लाकडी कपाट, मुलांना बसायला बेंचेस तसेच शालोपायोगी साहित्य, वह्या, कंपास बॉक्स, स्कूल  बॅग्ज, खेळाचे साहित्य, ई लर्निंग कीट इत्यादी साहित्य भेट दिले. यासाठी एकूण ₹८२,०००/- खर्च आला. मुलांच्या आणि शिक्षकांच्या चेहऱ्यावरील आनंद खूप काही देऊन गेला.

Comments

Popular posts from this blog

अपघातग्रस्त विद्यार्थिनीस मदतीचे आवाहन

राजेंद्र भोजने व उज्वला टेमगिरे यांना पीएच. डी. पदवी जाहीर

वैष्णवी लक्ष्मण मखर हिचे सी. ए. परीक्षेत घवघवीत यश