संघटन व समाजसेवा पुरस्काराने राजू भेगडे सन्मानित

 संघटन व समाजसेवा पुरस्काराने राजू भेगडे सन्मानित



  तळेगाव दाभाडे दि.१२ (संपादक - डॉ.संदीप गाडेकर) सोलापूर धाराशिव मावळ मित्र मंडळाच्या वतीने आयोजित स्नेह मेळाव्यामध्ये नुकतेच विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत असणाऱ्या व्यक्तींना समाजभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष उद्योजक रामदास काकडे हे होते. माजी मंत्री संजय (बाळा) भेगडे, राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष गणेश खांडगे, माजी तालुका अध्यक्ष बबनराव भेगडे, संत तुकाराम सहकारी साखर कारखाना उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे, मंडळाचे अध्यक्ष हरिश्चंद्र गडसिंग, सचिव रामराव जगदाळे यांच्या शुभहस्ते व उपस्थितीत सदर पुरस्कार देण्यात आले.



    यावेळी संघटन व समाजसेवा पुरस्कार मळवंडी ढोरे शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक नेते राजू भेगडे यांना प्रदान करण्यात आला. सांगाती सह्याद्रीचे मावळ शिक्षक मित्र परिवार, मैत्र जीवांचे व श्री क्षेत्र पंढरपूर अशा विविध शिक्षक ग्रुपच्या माध्यमातून त्यांनी समाजसेवेची अनेक कामे केलेली आहेत.

सांगाती सह्याद्रीचे मावळ शिक्षक ग्रुप च्या माध्यमातून ठाकर व कातकरी वस्ती अशा विविध ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची मदत करण्यात आली आहे.

निसर्ग चक्रीवादळ झाल्यानंतर  राजमाची इथं प्रत्यक्ष श्रमदान व इतर वस्तूंची ग्रुपच्या माध्यमातून मदत दिलेली आहे..विद्यार्थ्यांना व ग्रामस्थांना मदत करण्यात आली आहे.

    मोतीबिंदू शस्त्रक्रिया व चेश्मे वाटप कार्यक्रम ग्रुप च्या माध्यमातून घेण्यात आला आहे.

   अनेक गड किल्ल्यांवर भटकंती व ऐतिहासिक वास्तुंचा अभ्यास करण्यात येत आहे.

विविध नैसर्गिक सहलींचे आयोजन व नियोजन करण्यात ते महत्त्वाची भूमिका बजावतात.ग्रुपमधील 

 मनोज भांगरे, मुकुंद तनपुरे, तानाजी  शिंदे, सोपान आसवले, भरत शेटे, उमेश माळी, अजित  नवले, सुभाष भानुसघरे, रघुनाथ मोरमारे ,सुनील साबळे, गोकुळ लोंढे ,अंकुश मोरमारे, कुंडलिक लोटे, दीपक मेमाणे, राहुल जाधव, अनिल कळसकर,सचिन ढोबळे, प्रमोद भोईर इत्यादी सदस्यांच्या सहकार्याने ते हे उपक्रम राबवित असतात.

Comments

Popular posts from this blog

अपघातग्रस्त विद्यार्थिनीस मदतीचे आवाहन

राजेंद्र भोजने व उज्वला टेमगिरे यांना पीएच. डी. पदवी जाहीर

वैष्णवी लक्ष्मण मखर हिचे सी. ए. परीक्षेत घवघवीत यश