एमआयटी बी.एड. कॅालेजला ४२ परदेशी पाहुण्यांची भेट

 एमआयटी बी.एड. कॅालेजला ४२ परदेशी पाहुण्यांची भेट 



आळंदी: (संपादक - डॉ.संदीप गाडेकर )

माईर्स एमआयटी संत ज्ञानेश्वर बी.एड. कॉलेज मध्ये 'अरोरा' प्रकल्पाच्या निमित्ताने 42 परदेशी पाहुण्यांनी भेट दिली.या भेटीमध्ये बी.एड. महाविद्यालयाकडून राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमाबाबतची माहिती देण्यात आली. याप्रसंगी जर्मनी मधून आलेल्या अरोरा प्रकल्पाच्या मुख्य मूल्यमापक डॉ. एलिझाबेथ स्मिथ यांनी या कार्यक्रम प्रसंगी महाविद्यालयाचे अभिनंदन करताना एमआयटी संस्थेचे संस्थापक डॉ. विश्वनाथ कराड सर हे विश्वशांती दूत असल्याचे सांगितले. तसेच अरोरा प्रकल्पामध्ये महाविद्यालयाकडून "कट्टरतावादाचे निर्मूलन" करताना राबविलेल्या विविध प्रकल्पाचे सुद्धा कौतुक केले. डॉ.जोस डेलगॉडो ( स्पेन )त्यांनी विद्यार्थी-शिक्षकांबरोबर सध्याच्या शिक्षण पद्धतीत शिक्षकाची भूमिका किती आवश्यक आहे याबाबत चर्चा केली. तसेच अरोरा प्रकल्पाचे भारताचे प्रमुख डॉ.अजय सुराणा हे बनस्थली विद्यापीठ, राजस्थान येथील विभाग प्रमुख यांनी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुरेंद्र हेरकळ आणि सर्व प्राध्यापक वृंदांचे अभिनंदन केले. या अरोरा प्रकल्प मूल्यमापनामध्ये भारतीय आणि परदेशी असे 42 तज्ञांनी भेट दिली. सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या वतीने माईर्स एमआयटी संत ज्ञानेश्वर बी.एड. महाविद्यालयाची निवड ही विद्यापीठ कुलसचिव डॉ. विजय खरे यांनी केली तसेच महाविद्यालयाला भेटीसाठी विशेष मार्गदर्शन हे डॉ. खरे, डॉ. सुषमा भोसले आणि डॉ.बी. बी. वाफारे यांनी केले. सदर भेटीमध्ये या परदेशी पाहुण्यांचे महाविद्यालयाकडून महाराष्ट्रीयन फेटा बांधून स्वागत केले तर अस्सल महाराष्ट्रीयन पद्धतीचे पुरणपोळीचे जेवण त्यांना देण्यात आले.या भेटीमुळे विद्यार्थी शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आणि ही परदेशी पाहुण्यांची भेट महाविद्यालयाच्या प्रगतीमध्ये एक मानाचा तुरा असल्याचे प्राचार्य डॉ.सुरेंद्र हेरकळ यांनी सांगितले.

Comments

Popular posts from this blog

अपघातग्रस्त विद्यार्थिनीस मदतीचे आवाहन

राजेंद्र भोजने व उज्वला टेमगिरे यांना पीएच. डी. पदवी जाहीर

वैष्णवी लक्ष्मण मखर हिचे सी. ए. परीक्षेत घवघवीत यश