इनरव्हील क्लब ऑफ तळेगाव दाभाडे तर्फे दिव्यांग व्यक्तींची आरोग्य तपासणी

 इनरव्हील क्लब ऑफ तळेगाव दाभाडे तर्फे दिव्यांग व्यक्तींची  आरोग्य  तपासणी 


तळेगाव दाभाडे दि. 30 (संपादक - डॉ.संदीप गाडेकर ) दिव्यांग सप्ताहाच्या  निमित्ताने इनरव्हील क्लब ऑफ तळेगाव दाभाडे तर्फे कामयानी पुणे या संस्थेच्या  सिंधुताई जोशी उद्योग केंद्र, लिंब फाटा, तळेगाव दाभाडे येथे दिव्यांग व्यक्तींची  आरोग्य  तपासणी करण्यात आली. कामयानीचे व्यवस्थापक  श्री दीपक सोनवणे आणि श्री  प्रसाद  करमरकर यांनी  संस्थेची  माहिती दिली.  सध्या तेथील  पटसंख्या 30 आहे.  वय वर्षे 18 ते  45 या  वयोगटांतील विशेष व्यक्ती रोज सकाळी 10 ते दुपारी 4 पर्यंत तेथे  येतात.  त्यांना स्वच्छता, टापटीप  शिकवली जाते.  त्यांच्या  व्यक्तिमत्त्व  विकासावर  भर  दिला  जातो. 



डॉ दिपाली झंवर आणि डॉ राणी बच्चे यांनी  या विशेष ज्येष्ठ विद्यार्थ्यांशी संवाद साधला.  त्यांची  आरोग्य तपासणी  करून  गरजूंना  मोफत उपचार करणार असल्याचे सांगितले.  प्रेसिडेंट संध्या थोरात यांनी  कामयानी संस्थेबद्दल गौरवोद्गार काढले.  सध्या सर्वसामान्य  मुलांना सांभाळणे lifestyle मुळे  अवघड  झालेले असताना  अशा  दिव्यांग विद्यार्थ्यांना नियमितपणे हसतमुखाने  सांभाळणे,  त्यांचा  विकास करणे हे  खरोखरच चॅलेंजिंग आहे. ही  संस्था  गेली अनेक  वर्ष अव्याहतपणे हे  काम करते आहे.  येथील  मॅनेजमेंट कमिटी आणि स्टाफ मेंबर्स यांचे कौतुक करावे तेवढे कमीच, असे त्या म्हणाल्या. यावेळी त्यांच्या बरोबर सेक्रेटरी निशा पवार आणि  जॉइन्ट सेक्रेटरी रश्मी थोरातही उपस्थित  होत्या.  जिलेबीने सर्व  विद्यार्थ्यांचे तोंड गोड  करण्यात  आले.  ह्या  हृद्य  भेटीचा त्यांना  फार आनंद झाला.



Comments

Popular posts from this blog

अपघातग्रस्त विद्यार्थिनीस मदतीचे आवाहन

राजेंद्र भोजने व उज्वला टेमगिरे यांना पीएच. डी. पदवी जाहीर

वैष्णवी लक्ष्मण मखर हिचे सी. ए. परीक्षेत घवघवीत यश