विद्यार्थी गुणगौरव समारंभ व सेवानिवृत्ती सन्मान सोहळा संपन्न

 विद्यार्थी गुणगौरव समारंभ व सेवानिवृत्ती सन्मान सोहळा संपन्न  



तळेगाव स्टेशन दि. 22 ( वार्ताहर ) न्यू इंग्लिश स्कूल टाकवे बुll विद्यालयात स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने विद्यार्थी गुणगौरव समारंभ व सेवानिवृत्ती सन्मान सोहळा पार पडला. डिसेंबर २०२३ मध्ये विद्यालयात विविध उपक्रम व क्रीडा स्पर्धा पार पडल्या त्याचा बक्षिस समारंभ संस्थेचे सचिव अशोकजी बाफना यांच्या हस्ते शुभहस्ते पार पडला. तसेच विद्यालयातील सेवा निवृत्त होणारे प्राचार्य बाळासाहेब उभे ,तसेच इतर शिक्षक असवले नारायण , माणिक जाधव व पिराजी वारिंगे यांचा सेवा सन्मान सोहळा संस्थेचे अध्यक्ष तुकाराम असवले व सर्व संचालक मंडळ यांच्या उपस्थितीत मान्यवरांच्या शुभहस्ते सहपत्निक झाला . समारंभ प्रसंगी सरपंच,उपसरपंच ,ग्रा.पंचायत सदस्य, पो.पाटील,चेअरमन व ग्रामस्थ माजी विद्यार्थी बहु संखेने उपस्थित होते. मुख्याध्यापक संघाचे, माध्यमिक शिक्षक संघाचे, प्राथमिक शिक्षक संघाचे अनेक पदाधिकारी समारंभ प्रसंगी उपस्थित होते. त्यांनी सन्मार्थीना  शुभेच्छा दिल्या.


 कार्यक्रमाचे प्रास्तविक  नारायण असवले यांनी व उपस्थितांचे स्वागत प्राचार्य बाळासाहेब उभे यांनी केले. तसेच मान्यवरांचे आभार सदाशिव जांभूळकर यांनी व्यक्त केले. सूत्र संचालन सोपान असवले यांनी केले. कार्यक्रमाचे नियोजन सतिश आल्हाट, दत्तात्रय गायकवाड, आनंदराव जांभूळकर, गोरख कुंभार,सुरज जावळे यांनी केले.

Comments

Popular posts from this blog

अपघातग्रस्त विद्यार्थिनीस मदतीचे आवाहन

राजेंद्र भोजने व उज्वला टेमगिरे यांना पीएच. डी. पदवी जाहीर

वैष्णवी लक्ष्मण मखर हिचे सी. ए. परीक्षेत घवघवीत यश