सावित्रीची लेक या पुरस्काराने सौ. स्नेहल दत्तात्रेय बाळसराफ सन्मानित
तळेगाव दाभाडे दि.7 (प्रतिनिधी)
श्री संत सावता माळी समाज विकास मंडळ कळंबोली, नवी मुंबई यांच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची 193 वी जयंती व महिला मुक्ती दिन या निमित्ताने महाराष्ट्र राज्याचे गृहनिर्माण, तसेच इतर मागासवर्ग बहुजन कल्याण मंत्री मा. नामदार श्री. अतुलजी सावे यांच्या शुभहस्ते स्नेहल दत्तात्रेय बाळसराफ यांना सावित्रीची लेक हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
सौ स्नेहल बाळसराफ शैक्षणिक व सामाजिक कार्यातील योगदानाबद्दल मंडळातर्फे सौ स्नेहल बाळसराफ यांना विशेष सन्मानित करण्यात आले. मा. नामदार श्री अतुलजी सावे यांनी सौ. स्नेहल बाळसराफ यांच्या सामाजिक व शैक्षणिक कार्यातील योगदानाबद्दल विशेष कौतुक करून महिलांच्या विकासासाठी सौ. स्नेहल बाळसराफ यांनी सामाजिक कार्य जोमाने पुढे चालू ठेवावे, तसेच शैक्षणिक क्षेत्रात मोठा अनुभव असल्याने अधिक लिखाण करून समाजाला प्रबोधित करावे असे मत स्पष्ट करून त्यांच्या कार्याचा गौरव केला. सौ बाळसराफ याचे माध्यमातून समाजातील महिलांचे संघटन, युवा पिढीस मार्गदर्शन, शिक्षकांना पुरस्कार तसेच शिक्षक प्रबोधन विद्यार्थी जातात योजना इत्यादी विविध समाज उपयोगी कामे केल्यामुळे त्यांना आज 38 पुरस्कार प्रदान करून गौरवण्यात आले आहे असे त्यांनी आग्रहाने प्रतिपादन केले याप्रसंगी श्री नितीन शंकर जाधव एडवोकेट क्षीरसागर जयराम डोके रोहिदास लोखंडे रघुनाथ ढोक रामदासजी डोके प्रकाश ढोकणे प्राचार्य डॉ. दत्तात्रय बाळसराफ, सौ वैशाली भुजबळ श्री कल्याणराव आखाडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. श्री सावता माळी समाज विकास मंडळ यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची पालखी व रथ यात्रा काढली त्यावेळी प्रचंड जनसमुदाय उपस्थित जनसमुदाय सहभागी झाला होता.
Comments
Post a Comment