डॉ. डी. वाय. पाटील इंस्टीट्यूट ऑफ मॅनेजमेंट अ‍ॅण्ड इंटरप्रेणीयर डेव्हलपमेंट, वराळे, तळेगाव पुणे येथे नोकरी / रोजगार मेळाव्याचे आयोजन

 डॉ. डी. वाय. पाटील इंस्टीट्यूट ऑफ मॅनेजमेंट अ‍ॅण्ड इंटरप्रेणीयर डेव्हलपमेंट, वराळे, तळेगाव पुणे येथे नोकरी / रोजगार मेळाव्याचे आयोजन


   तळेगाव दाभाडे (प्रतिनिधी) शनिवार दिनांक ६ जानेवारी २०२४ रोजी डॉ. डी. वाय पाटिल एज्युकेशनल फेडरेशन अंतर्गत डॉ. डी वाय पाटिल इंस्टीट्यूट ऑफ मॅनेजमेंट अ‍ॅण्ड इंटरप्रेणीयर डेव्हलपमेंट या संस्थेमध्ये नोकरी / रोजगार मेळाव्याचे आयोजन केले होते. सदर मेळाव्या मध्ये एकुण २ हजार १२२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्या पैकी ९५८ विद्यार्थी प्रत्यक्ष मुलाखती साठी उपस्थित राहीले होते. हा एकदिवसीय मेळावा अभूतपूर्व ठरला आहे.

   सामाजिक बांधिलकी व समाजकार्य या भावनेतून संस्थेचे अध्यक्ष डॉ सुशांत पाटील, सचिव अॅड अनुजा सुशांत पाटील तसेच संचालिका डॉ. प्रियंका सिंग यांच्या संकल्पनेतून या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्या करीता पुणे व परिसरातील ३० पेक्षा जास्त नामवंत कंपन्या सहभागी झाल्या होत्या. तळेगाव व परिसरातील बेरोजगार तरुण व तरुणींना एकाच ठिकाणी विविध कंपन्यां मध्ये रोजगार मिळण्या च्या उद्देशाने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्या मध्ये उपस्थित राहण्या करीता निशुल्क बस सेवा पुरविण्यात आली होती.



  रोजगार मेळावा यशस्वी पार पाडण्या करीता डॉ. एस. डी. शिरबहाद्दुरकर, प्रा. प्रमोद पांडे, डॉ. सुरेश माळी, ट्रेनिंग अॅड प्लेसमेंट अॉफीसर डॉ. सचिन आंबेकर, एम. बी. एस. विभाग प्रमुख डॉ. हरीनी राजन, एम. सी. ए. विभाग प्रमुख डॉ अश्विनी चव्हाण तसेच संस्थेचे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परीश्रम घेतले.

Comments

Popular posts from this blog

अपघातग्रस्त विद्यार्थिनीस मदतीचे आवाहन

राजेंद्र भोजने व उज्वला टेमगिरे यांना पीएच. डी. पदवी जाहीर

वैष्णवी लक्ष्मण मखर हिचे सी. ए. परीक्षेत घवघवीत यश