सेक्टर 12 मध्ये शिवजयंती उत्साहात साजरी

 सेक्टर 12 मध्ये शिवजयंती उत्साहात साजरी


   भोसरी दि १९ (प्रतिनिधी) शिवजयंती उत्सव समिती सेक्टर-12 च्या वतीने यावर्षी प्रथमच शिवजयंती उत्सव भव्यदिव्य स्वरूपात साजरा करण्यात आला, या कार्यक्रमासाठी शिवजन्मभूमी किल्ले शिवनेरीवरून शिवज्योत आणण्यात आली, ज्योत आणण्यासाठी 40 ते 50 जणांनी अखंड दौड करून 6 तासात 90 km अंतर पार केला.


       अतिशय उत्तम नियोजन, करून पिंपरी चिंचवड शहरातील सर्वात शिस्तबद्ध मिरवणूक पार पाडली, मिरवणुकीत कोणताही धांगडधिंगा न करता पारंपरिक ढोल ताशाच्या निनादात पालखीतून महाराजांची मिरवणूक काढण्यात आली.तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबीर संपन्न झालं

       

 सर्वात आकर्षण म्हणजे सेक्टर 12 मधील महिलांनी पारंपरिक नऊवारी साडी, डोक्यावर रुबाबदार फेटा असा फ्राव करून  महाराजांचा पाळणा सादर केला. 


    शिवव्याख्याते प्रमोदजी कारकर यांचं शिववख्यान तर  सर्वांना मंत्रमुग्ध करून गेले त्यांनी ज्या पंचसूत्री सांगितल्या त्या जर आचरणात आणल्या तर जीवन समृद्ध होईल.महाराजांच्या महाआरतीने कार्यक्रमाची सांगता झाली अ कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्वानीच प्रयत्न केले असल्याची माहिती श्री बाबाजी कळमकर यांनी दिली

 

Comments

Popular posts from this blog

अपघातग्रस्त विद्यार्थिनीस मदतीचे आवाहन

राजेंद्र भोजने व उज्वला टेमगिरे यांना पीएच. डी. पदवी जाहीर

वैष्णवी लक्ष्मण मखर हिचे सी. ए. परीक्षेत घवघवीत यश