व्ही.पी.एस कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नोलॉजी मध्ये स्वराज्याचे संस्थापक श्री. छत्रपती शिवाजी महाराज यांची 394 वी जयंती उत्साहात साजरी

व्ही.पी.एस कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नोलॉजी मध्ये स्वराज्याचे संस्थापक श्री. छत्रपती शिवाजी महाराज यांची 394 वी जयंती उत्साहात साजरी

लोणावळा दि.२० (प्रतिनिधी ) 

व्ही.पी.एस. कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नोलॉजी मध्ये स्वराज्याचे संस्थापक श्री. छत्रपती शिवाजी महाराज यांची 394 वी जयंती तारखेप्रमाणे १९ फेब्रुवारी 2024 रोजी मोठ्या उत्साहात एखाद्या सणाप्रमाणे साजरी करण्यात आली.

                 या कार्यक्रमावेळी अध्यक्षा डॉ. मृणालिनी गरवारे, संस्थेचे कार्यवाहक डॉ.सतिश गवळी, सहकार्यवाहक श्री. विजय भुरके व संस्थेचे गव्हर्निंग कौन्सिल मेम्बर श्री.भगवान आंबेकर , श्री.कुदळे सर, संस्थेचे सभासद श्री. नितीन गरवारे, सौ.कुदळे मॅडम कॉलेजचे मा. प्राचार्य डॉ. मानव अ.ठाकूर या सर्वांच्या हस्ते "श्री छत्रपती शिवाजी महाराज" यांच्या मुर्तीचे पूजन करून पुष्पमाला अर्पण करण्यात आली.

       तसेच या कार्यक्रमावेळी संस्थेच्या अध्यक्षा डॉ मृणालिनी गरवारे, संस्थेचे कार्यवाहक डॉ.सतिश गवळी, सहकार्यवाहक श्री. विजय भुरके, संस्थेचे सभासद श्री. नितीन गरवारे, यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

                        महाविदयालयातील विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल मनोगत व्यक्त केले तसेच पोवाडे सादर करत त्यांनी शिवकालीन इतिहास पुनरावृत्तीत केला. आणि प्रथम वर्ष इंजिनिअरींगच्या विद्यार्थ्यांनी नृत्य सादर केले. विद्यार्थ्यांनी विविध कला दिग्दर्शन करत ढोल ताशांच्या गजरात मोठ्या उत्साहात छत्रपती शिवाजी महाराजांच्या नामाचा जयघोष करण्यात आला. 

              कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्याचे बहुमोल सहकार्य लाभले.

Comments

Popular posts from this blog

अपघातग्रस्त विद्यार्थिनीस मदतीचे आवाहन

राजेंद्र भोजने व उज्वला टेमगिरे यांना पीएच. डी. पदवी जाहीर

वैष्णवी लक्ष्मण मखर हिचे सी. ए. परीक्षेत घवघवीत यश