वेदांगी नारायण असवले आंदर मावळातील पहिली सी. ए.

 वेदांगी नारायण असवले आंदर मावळातील  पहिली सी. ए.



तळेगाव स्टेशन दि 15 (प्रतिनिधी) टाकवे बुद्रुक येथील श्री. संत तुकाराम शिक्षण प्रसारक मंडळाचे विद्यमान अध्यक्ष तुकाराम असवले व ह.भ. प. सुभाष असवले यांची पुतणी आणि मावळ तालुका माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष नारायण असवले व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा टाकवे  बु. मुख्याध्यापिका वंदना नारायण असवले या शिक्षक दाम्पत्याची सुकन्या वेदांगी असवले हिने सी. ए. परीक्षेत उतृंग यश संपादन करून  टाकवे बु.  व  असवले  परिवाराचे नाव भारतात पोहोचवले. भारतात दोन्ही ग्रुपच्या परीक्षेचा निकाल फक्त ९.४२ टक्के लागला आहे. वेदांगीने सातत्यपूर्ण अभ्यास करून पहिल्याच प्रयत्नात उज्वल यश प्राप्त केले. मावळ तालुक्यातील आदर्श शिक्षक नारायण असवले व वंदना असवले यांनी  वेदांगीचे जीवन सार्थक करून दाखवल्याचे भावना व्यक्त केली.

टाकवे बु. गावातील ग्रामस्थ, नातेवाईक, शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांनी  वेदांगी व तिच्या कुटुंबीयांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. तसेच सोलापूर- धाराशिव मावळ मित्र मंडळ आणि मावळ तालुक्यातील माध्यमिक, प्राथमिक शिक्षक संघटना, पतसंस्था पदाधिकारी, शिक्षक स्टाफ, अधिकारी मित्रपरिवार, नातेवाईक, राजकीय पक्षाचे पदाधिकारी, शैक्षणिक संस्थांचे पदाधिकारी इत्यादींकडून वेदांगीचे कौतुक होत असून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Comments

Popular posts from this blog

अपघातग्रस्त विद्यार्थिनीस मदतीचे आवाहन

राजेंद्र भोजने व उज्वला टेमगिरे यांना पीएच. डी. पदवी जाहीर

वैष्णवी लक्ष्मण मखर हिचे सी. ए. परीक्षेत घवघवीत यश