शिवरायांचा पराक्रम हे मावळ तालुक्याचे खरे संचित - रामदास काकडे

 शिवरायांचा पराक्रम हे मावळ तालुक्याचे खरे संचित - रामदास काकडे

तळेगाव दाभाडे दि.१९ (प्रतिनिधी) :- शिवरायांचा कार्यकाळ हा महाराष्ट्रावर नव्हे तर देशावर गारूड बनून राहिला. शिवाजी या तीन जादुई अक्षरांनी संपूर्ण देश व्यापून राहिला आहे. छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने मावळची भूमी पावन झलेली आहे. महाराजांचा पराक्रम हेच आपले खरे संचित असल्याची भावना इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे अध्यक्ष आणि प्रसिद्ध उद्योजक रामदासजी काकडे यांनी व्यक्त केली. इंद्रायणी विद्या मंदिर संस्था आयोजित छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३९४ व्या जयंती सोहळ्यात ते बोलत होते.



या प्रसंगी संस्थेचे सचिव चंद्रकांत शेटे, इंद्रायणी महाविद्यालायचे प्राचार्य डॉ. संभाजी मलघे, बी. फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय आरोटे, डी. फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. जी. एस. शिंदे, अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रुपेश पाटील, संस्कृतिक विभागाचे प्रमुख डॉ. प्रमोद बोराडे, गोरख काकडे आदी मान्यवर उपस्थित होत.

पुढे बोलताना काकडे म्हणाले की, शिवरायांचे हिंदवी स्वराज्य हे फक्त हिंदूंचे राज्य नव्हते तर समग्र रयतेचे राज्य होते. महाराजांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकताना काकडे म्हणाले की, स्त्री सन्मानाचा नवा आदर्श महाराजांनी उभा केला, सागरी आरमाराचे महत्त्व ओळखून त्याची निर्मिती केली, शेतकऱ्यांच्या बाबत अतिशय जागरूक असे आपले राजे जगात अद्वितीय होते. फायनान्स, मॅनेजमेंट, टीमवर्क या आज जगात अभ्यासल्या जाणाऱ्या ज्ञान शाखा महाराजांनी उत्तम राबविल्या होत्या. या अर्थाने ते काळाच्या पुढे धावणारे महापुरुष होते असे काकडे म्हणाले.


कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्तविक इंद्रायणी महाविद्यालायचे प्राचार्य डॉ. संभाजी मलघे यांनी केले. आपल्या महाविद्यालयातील प्रत्येक विद्यार्थी हा छत्रपतींचा मावळा आहे. महाराजांच्या कर्तृत्वातून प्रेरणा घेऊन विद्यार्थ्यांनी आपले आयुष्य घडवावे. महाराजांच्या विचारांचे पाईक म्हणुन शिस्त आणि गुणवत्ता याचे आचरण विद्यार्थांनी करावे असा सल्ला यावेळी प्राचार्य डॉ. मलघे यांनी विद्यार्थ्यांना दिला.

यावेळी तळेगाव येथील दंत चिकित्सक व शिवव्याख्याते डॉ. प्रवीण माने यांनी विद्यार्थ्यांना संबोधित केले. छत्रपती शिवराय म्हणजे खरा आदर्श आणि आपल्या आयुष्याला झालेला परिसस्पर्श आहे. ध्येय उच्च, उदात्त आणि प्रमाणिक असेल तर असामान्य पराक्रम जगविता येतो ही मोठी शिकवण शिवचरित्रातून मिळते असे गौवोद्गार डॉ. माने यांनी काढले. स्वराज्य स्थापनेच्या कामात विचार, व्यावस्थापण आणि शस्त्रे यांचे सुयोग्य नियोजन साधून छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचे हिंदवी स्वराज्य निर्माण केले असे सांगून डॉ. माने यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.


यावेळी पारंपरीक वेशभूषेतील विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, मासाहेब जिजाऊ, राणीसाहेब साईबाई यांच्या व्यक्तिरेखा साकारल्या. यावेळी पालखीतून छत्रपती शिवरायांची पारंपरिक पद्धतीने मिरवणूक काढण्यात आली. मोठ्या संख्येने विद्यार्थी, शिक्षक, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

अपघातग्रस्त विद्यार्थिनीस मदतीचे आवाहन

राजेंद्र भोजने व उज्वला टेमगिरे यांना पीएच. डी. पदवी जाहीर

वैष्णवी लक्ष्मण मखर हिचे सी. ए. परीक्षेत घवघवीत यश