व्ही.पी.एस कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नोलॉजी मध्ये Sports Week साजरा
लोणावळा दि.14 (प्रतिनिधी)
व्ही.पी.एस कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नोलॉजी मध्ये दिनांक 29/01/2024 ते दिनांक 06/02/2024 रोजी शैक्षणिक वर्ष 2023-24 चा Sports Week साजरा करण्यात आला यामध्ये विद्यार्थ्यांनी विविध खेळात सहभाग घेतला होता. यामध्ये विजेते व विविध खेळामध्ये सहभाग घेतलेल्या विद्यार्थ्यांचा पारितोषिक वितरण समारंभ दिनांक 06/02/2024 रोजी कॉलेजच्या seminar hall मध्ये आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महाविद्यालयातील विविध शाखांचे विभाग प्रमुख डॉ.हरीश हरसुरकर, प्रो.हुसेन शेख, प्रो. प्राणेश चव्हाण, प्रो.सोनी राघो, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रो. प्रीती चोरडे यांची उपस्थिती लाभली. मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी संस्थेच्या अध्यक्षा डॉ.मृणालिनी गरवारे, संस्थेचे कार्यवाहक डॉ.सतिश गवळी, सहकार्यवाहक श्री. विजय भुरके तसेच संस्थेचे गव्हर्निंग कौन्सिल मेम्बर श्री.भगवान आंबेकर, ऍडव्होकेट श्री.संदीप अगरवाल संस्थेचे सभासद श्री. नितीन गरवारे,श्री स्वप्निल गवळी कॉलेजचे मा. प्राचार्य डॉ. मानव अ.ठाकूर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
तसेच यावेळी महाविद्यालयाचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
Comments
Post a Comment