डी.एड. व बी.एड. माजी विद्यार्थ्यांकडून सांस्कृतिक हॉल साठी 12 सिलिंग व 4 स्टॅंडिंग फॅन सप्रेम भेट

वडगाव मावळ दि. 23 (डॉ.संदीप गाडेकर) श्री. संत तुकाराम शिक्षण प्रसारक मंडळाच्या हरकचंद रायचंद बाफना डीएड कॉलेज व अध्यापक महाविद्यालय वडगाव मावळ च्या विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक हॉल साठी 12 सिलिंग व 4 स्टॅंडिंग फॅन सप्रेम भेट दिले. 


यावेळी संस्थेचे सचिव अशोकजी बाफना,  चंद्रकांत ढोरे, प्राचार्य हिरामण लंघे, प्राचार्य डॉ. अनिता धायगुडे डीएड कॉलेज माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष  तानाजी शिंदे, शिक्षक नेते राजू भेगडे, शिवाजी ठाकर, मावळ शिक्षक पतसंस्थेचे चेअरमन राहुल जाधव, माध्यमिक शिक्षक पतसंस्थेचे चेअरमन सोपान असवले, माजी चेअरमन ज्ञानेश्वर शिवणेकर, शिक्षक संघाचे माजी सरचिटणीस उमेश माळी, शिक्षक पतसंस्थेचे संचालक संजय ठुले, मनोज भांगरे व सर्व डीएड व बीएड चा स्टाफ उपस्थित होते. यावेळी अध्यक्ष तानाजी शिंदे व उमेश माळी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ज्ञानेश्वर शिवणेकर यांनी केले, आभार राजू भेगडे यांनी मानले.

Comments

Popular posts from this blog

कामगार ते पीएच.डी.पदवीधर : डॉ.सुनील मगन मोरे यांचा प्रेरणादायी प्रवास

लिली इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज चा निकाल शंभर टक्के

माध्यमिक शिक्षक संघाचे जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार जाहीर