व्ही.पी.एस कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नोलॉजी मध्ये जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

लोणावळा दि. 8 (प्रतिनिधी) व्ही.पी.एस कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नोलॉजी मध्ये आज दिनांक 08/03/2023 रोजी जागतिक महिला दिनानिमित्त कार्यक्रम साजरा करण्यात आला .महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ दरवर्षी,८ मार्च हा दिवस जागतिक महीला दिन म्हणून साजरा करण्यात येतो.

              या कार्यक्रमासाठी अध्यक्षा  म्हणून  माजी नगरसेविका लोणावळा नगरपरिषद  व भाजपा महाराष्ट्र प्रदेश महिला आघाडीच्या कार्यकारिणी सदस्या  लोणावळा वूमन फाउंडेशनच्या संस्थापक सौ. बिंद्राताई गणात्रा, व प्रमुख पाहुणे म्हणून विद्यमान सरपंच ग्रुप ग्रामपंचायत वकसाई सौ.सोनाली मनोज जगताप यांची उपस्थिती लाभली.यावेळी महाविद्यालयाच्या  संगणक शाखेच्या विभाग प्रमुख प्रो. सोनी राघो, व्ही.पी. एस इंग्लिश मिडीअम स्कुलच्या मुख्याध्यापिका सौ. निशा नाईक सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रो. प्रीती चोरडे,प्रो.मनीषा कचरे,प्रो.रश्मी भुंबरे ,प्रो.श्रुती सुखधान,प्रो.तनुजा हुलावळे, प्रो.सायली धरणे,प्रो.पूनम  वणवे,प्रो.प्राची दाते, लायब्ररीअन सौ. स्नेहल कुटे, या उपस्थित होत्या.

                तसेच या कार्यक्रमासाठी संस्थेच्या अध्यक्षा डॉ. मृणालिनी गरवारे,कार्यवाहक डॉ. सतीश गवळी, सह कार्यवाहक श्री. विजय भुरके, संस्थेचे सभासद श्री. नितीन गरवारे,श्री.भगवान आंबेकर, अँड. संदीप अगरवाल, श्री. स्वप्निल गवळी, कॉलेजचे प्राचार्या डॉ. मानव अ. ठाकूर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

Comments

Popular posts from this blog

अपघातग्रस्त विद्यार्थिनीस मदतीचे आवाहन

राजेंद्र भोजने व उज्वला टेमगिरे यांना पीएच. डी. पदवी जाहीर

वैष्णवी लक्ष्मण मखर हिचे सी. ए. परीक्षेत घवघवीत यश