मनकर्णिका संस्थेतर्फे विविध क्षेत्रातील महिलांचा सन्मान

तळेगाव दाभाडे दि. 10 (प्रतिनिधी) येथील मनकर्णिका संस्थापक अध्यक्ष सौ वीणाताई करंडे व पदाधिकारी यांच्यामार्फत सोपान शिव मंदिर येथे विविध क्षेत्रात ठसा उमटणाऱ्या महिलांचा सत्कार करण्यात आला मावळ तालुक्याचे लोकप्रिय आमदार यांच्या सुविद्य पत्नी कुलस्वामिनी महिला मंचाच्या संस्थापक अध्यक्ष सारिकाताई शेळके प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या.



  सत्कार मूर्तींमध्ये लोणावळा  पोलीस स्टेशनच्या पीएसआय दिपाली पाटील यांचा त्यांच्या कार्यामुळे सत्कार करण्यात आला तसेच तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनचे दामिनी पथक सुनंदा जाधव दामिनी_ त्यांचे सहकारी वैशाली कंद स्वाती टेमकर आशा धायडे वैशाली चौगुले सोनवणे मॅडम यांना सुद्धा त्यांच्या कर्तुत्वामुळे सन्मानित करण्यात आले  प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या तळेगाव केंद्राच्या संचालिका  प्रभा बहन व आयुर्वेदिक आरोग्य सेवा देणाऱ्या डॉ. कृतिका बारमुख अध्यात्मिक मार्गातून समाजसेवा करत असल्यामुळे   यांनाही सन्मानित करण्यात आले सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या विरांगणा महिला विकास प्रतिष्ठानच्या माजी नगरसेविका नीलिमाताई दाभाडे, नेहा गराडे सुजाता मलगे यांचा सन्मान करण्यात आला. बेवारस मुलांना सांभाळणाऱ्या अजित फाउंडेशनच्या विनया निंबाळकर तसेच सुंदर रांगोळ्या रेखाटन करणारी आपल्या तळेगावची कन्या रूपाली जवेरी यांना गौरवण्यात आले एक विशेष अभिनंदनपर पुरस्कार सायली करंडे हिचा करण्यात आला कारण नुकताच तिने डॉक्टरेट ही पदवी पीएचडी करून मिळवली "ग्रीन ह्यूमन रिसोर्स मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस " या विषयावर पीएचडी उत्तीर्ण केली सन्मानाचे स्वरूप सन्मानचिन्ह शाल श्रीफळ गुलाब पुष्प असे होते.

 कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सारिका नवले यांनी केले सर्व मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले कीर्ती पाटील व  यांनी आभार मानले.  शितल काळोखे सारिका काळोखे राजश्री गायकवाड ललिता भिवंगडे   शुभांगी भेगडे सारिका हुलावळे राधा बनकर सोनाली बनकर वर्षा शिंदे वर्षा जगतकर   रेखा जाधव सारिका शेटे विद्या शिळीमकर सारिका मोकाशे दिपाली गरड कल्पना बनसोडे सुप्रिया मोरे सारिका तरडे तेजश्री कदम जयश्री माळी मनीषा गिरासे जयश्री कळसगेंडा अश्विनी भंडारे राधा गोळकोंडे शुभांगी शिंदे सविता राजपूत आदींचे सहकार्य लाभले याबरोबर मोठ्या प्रमाणात महिलावर्ग उपस्थित होता

Comments

Popular posts from this blog

अपघातग्रस्त विद्यार्थिनीस मदतीचे आवाहन

राजेंद्र भोजने व उज्वला टेमगिरे यांना पीएच. डी. पदवी जाहीर

वैष्णवी लक्ष्मण मखर हिचे सी. ए. परीक्षेत घवघवीत यश