वसंतचैतन्य व्याख्यानमालेच्या अध्यक्षपदी रामराव जगदाळे तर कार्यवाहपदी गणेश धिवार यांची निवड


              श्री. रामराव जगदाळे 

                श्री. गणेश धिवार

तळेगाव दाभाडे दि.27 (संपादक - डॉ. संदीप गाडेकर) मावळ शिक्षक प्रबोधन परिवाराची सहविचार सभा नुकतीच संस्थापक राजूभाऊ भेगडे व शिवाजीराव ठाकर यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. मावळ शिक्षक प्रबोधन परिवारामार्फत शिक्षकांसाठी राबवल्या जाणाऱ्या वर्षभरातील विधायक उपक्रमांबाबत तसेच संस्थेच्या ध्येयधोरणांबाबत सदर बैठकीत चर्चा करण्यात आली. सर्व सदस्य शिक्षकांनी आपापली मते यात मांडली. मावळ शिक्षक प्रबोधन परिवारामार्फत दरवर्षी एप्रिल महिन्यात राबवल्या जाणाऱ्या वसंतचैतन्य व्याख्यानमालेच्या अध्यक्षपदी महाराष्ट्र राज्य केंद्रप्रमुख शिक्षक संघाचे माजी अध्यक्ष रामराव जगदाळे यांची तर कार्यवाहपदी मावळ तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेचे विद्यमान संचालक गणेश धिवार यांची निवड सर्वानुमते जाहीर करण्यात आली. तसेच संस्थेच्या नुतन प्रवर्तकांची निवडही याप्रसंगी जाहीर करण्यात आली.

सदर बैठकीचे नियोजन कार्याध्यक्ष श्री तानाजी शिंदे व श्री गोरख जांभुळकर यांनी केले.  मावळ तालुका खरेदी विक्री संघाचे नवनिर्वाचित संचालक गणेश विनोदे यांचा याप्रसंगी सत्कार करण्यात आला. सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मावळ शिक्षक प्रबोधन परिवाराचे सचिव अमोल चव्हाण यांनी केले तर आभार ज्ञानेश्वर शिवणेकर यांनी मानले.


यात बहुसंख्येने सदस्य शिक्षक व प्रवर्तक सहभागी झाले होते. या बैठकीच्या यशस्वितेसाठी  संतोष राणे, रघुनाथ मोरमारे, बाळासाहेब घारे, सुहास धस, धोंडिबा घारे, नारायण गायकवाड, संतोष भारती, संजय ठुले, उमेश माळी, सुनील साबळे, गंगासेन वाघमारे, ज्ञानेश्वर मोरमारे, अंकुश मोरमारे, योगेश ठोसर, हिराजी कुडव, राजू वाडेकर, मनोज भांगरे आदी सदस्यांनी परिश्रम घेतले.

Comments

Popular posts from this blog

अपघातग्रस्त विद्यार्थिनीस मदतीचे आवाहन

राजेंद्र भोजने व उज्वला टेमगिरे यांना पीएच. डी. पदवी जाहीर

वैष्णवी लक्ष्मण मखर हिचे सी. ए. परीक्षेत घवघवीत यश