प्रा. सुरेखा सुरेश निंगुळे - होळकर यांना पीएच.डी. पदवी प्रदान


तळेगाव स्टेशन दि. २९ (प्रतिनिधी) प्रा. सुरेखा निंगुळे - होळकर यांना 18 मार्च 2024 रोजी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आली. प्रा. सुरेखा ह्या सध्या सिद्धांत इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट पुणे येथे सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. शिक्षण क्षेत्रातील संस्थांमध्ये महिलांचे नेतृत्व विकास व ग्रामीण भागामध्ये स्त्रियांचे महत्त्व अनन्यसाधारण वाढत आहे, यासंदर्भात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील वाणिज्य व व्यवसाय विभागातील मानव संसाधन व्यवस्थापन यामध्ये डॉ. सुरेखा निंगुळे यांनी पुणे जिल्ह्यातील गावच्या विकासावर महिलांच्या नेतृत्वाचा प्रभाव (Impact of women leadership in development of villages in Pune district) हा संशोधन प्रबंध विद्यापीठाला सादर केला. यासाठी डॉ. अनिता खटके यांनी मार्गदर्शन केले त्याचप्रमाणे नेविल वाडिया इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च पुणे, येथील संशोधन प्रमुख डॉ. आनंद दडस यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले. त्यांच्या या यशाबद्दल डॉ. सुरेखा यांचे सिद्धांत महाविद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष आर. एस. यादव, उपाध्यक्ष सिद्धांत यादव, उपाध्यक्षा याशिका यादव , संचालक एस.जी. वाळके, सर्व सहकारी प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सन्मान करून अभिनंदन केले आहे. त्यांच्या या यशाबद्दल मावळ व पुणे परिसरातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.


त्यांच्या या यशामध्ये त्यांचे पती श्री. सुरेश निंगुळे, मुलगा स्वरीत निंगुळे, देवांश निंगुळे यांचा मोलाचा वाटा आहे. त्यांच्या मोठ्या भगिनी डॉ. आशालता भारजकर यांना सुद्धा काही दिवसापूर्वी पीएच.डी पदवी प्रदान झालेली आहे. दोघी बहिणी पीएच.डी. झाल्याबद्दल त्यांनी आपल्या आई रुक्मिणी जगन्नाथ होळकर व वडील जगन्नाथ होळकर यांचे मनापासून आभार व्यक्त केले.




Comments

Popular posts from this blog

अपघातग्रस्त विद्यार्थिनीस मदतीचे आवाहन

राजेंद्र भोजने व उज्वला टेमगिरे यांना पीएच. डी. पदवी जाहीर

वैष्णवी लक्ष्मण मखर हिचे सी. ए. परीक्षेत घवघवीत यश