विद्या विकास मंदिर माध्य. व उच्च. माध्यमिक विद्यालय राजुरी च्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा

 कु. तन्वी संतोष शिंदे हीची जवाहर नवोदय विद्यालय प्रवेशासाठी निवड


राजुरी दि.२ (प्रतिनिधी) जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत  इयत्ता ५ वीची विद्यार्थीनी कु. तन्वी संतोष शिंदे  हीची निवड झाली आहे. भारताचे माजी पंतप्रधान स्व.राजीवजी गांधी  यांच्या संकल्पनेतून जवाहर नवोदय विद्यालयाची निर्मिती झाली असून ती संपूर्ण देशभर कार्यरत आहेत. देशभरातील हुशार विद्यार्थ्यांचा शोध घेऊन ....  केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या मार्फत  त्यांना चांगल्या दर्जाच्या शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येतात. देशातील बौद्धिक क्षमतेचा वापर , देशाच्या विकासासाठी करणे, हा त्या पाठीमागील उद्देश आहे.  या विद्यालयाचा अभ्यासक्रम CBSE बोर्डाने निर्धारित  केलेला असतो.प्रत्येक जिल्ह्यासाठी एक विद्यालय  असते. पुणे जिल्ह्यासाठी शिक्रापूर येथे हे विद्यालय आहे. इयत्ता ६ वीच्या प्रवेशासाठी दरवर्षी प्रत्येक जिल्ह्यातून सुमारे  १०००० विद्यार्थी ही परीक्षा देतात. त्यात मेरिट नुसार प्रथम आलेल्या ८० विद्यार्थ्यांना येथे प्रवेश दिला जातो.आपल्या विद्यालयातील किमान एका विद्यार्थ्याची निवड दरवर्षी येथे होत असते, ही अभिमानास्पद बाब आहे. 

       कु. तन्वी ही अत्यंत हुशार विद्यार्थीनी असून या वर्षीच्या मंथन परीक्षेत देखील तीला २७८ गुण मिळाले आहेत. इंटरनॅशनल मॅथस् ऑलिम्पियाड परीक्षेत देखील तीने यश प्राप्त केले आहे. तीची चित्रकला देखील खूप सुंदर आहे. वक्तृत्वकलेत देखील ती निपुण असून या वर्षी १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंती निमित्ताने तीने विद्यालयात केलेले भाषण लक्षवेधी ठरले होते. तीचे वडील संतोष बबन शिंदे यांचे राजुरीत इलेक्ट्रीकल पार्टचे दुकान असून, आई राजश्री गृहिणी आहे. तीची मोठी बहीण साक्षी ही आपल्याच विद्यालयात १० वीत असून तीदेखील हुशार आहे. कु. तन्वी शिंदे , तीचे मार्गदर्शक शिक्षक श्री.राजेंद्र गाडेकर यांचे मुख्याध्यापक श्री. जी. के. औटी , पर्यवेक्षक श्री.सुनील पवार व सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच जनता विकास मंडळ राजुरी सर्व पदाधिकारी व संचालक मंडळ यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत. तिच्या या यशाबददल जुन्नर तालुक्यामधून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

संपादक - डॉ.संदीप गाडेकर 

8208185037

drsandipgadekar23@gmail.com


Comments

Popular posts from this blog

अपघातग्रस्त विद्यार्थिनीस मदतीचे आवाहन

राजेंद्र भोजने व उज्वला टेमगिरे यांना पीएच. डी. पदवी जाहीर

वैष्णवी लक्ष्मण मखर हिचे सी. ए. परीक्षेत घवघवीत यश