ट्रेकिंग पलटन गृप तर्फे वसुंधरा दिन साजरा

 

पुणे दि. 22 (प्रतिनिधी) जागतिक वसुंधरा दिनाच्या पूर्व दिनी ट्रेकिंग पलटन पुणे ग्रुपने उजनी धरणाच्या जलाशयात जलमग्न असणारे आणि पाण्याचा स्तर कमी झाल्यानंतर दर्शनासाठी खुले असणारे,  पळसनाथ मंदिर आणि परिसरात स्वच्छता करून वसुंधरा दिन साजरा केला.‌

दिनांक 21 एप्रिल 2024 रोजी उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात असलेल्या भिगवण पासून सुमारे 25 किलोमीटर अंतरावर असलेल्या पळसदेव गावाजवळी पळसनाथ मंदिरात ट्रेकिंग पलटन पुणे ग्रुपने भेट दिली. पळसनाथ मंदिर आणि आसपासचा परिसर पाण्याची पातळी कमी झाल्यानंतर दर्शनासाठी खुले होते. या दर्शनासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणात शनिवार रविवारी गर्दी करत असतात. येथे जाण्यासाठी पाचशे सहाशे मीटर बोटीने लावले लागते ही बोटिंगची व्यवस्था ग्रामस्थांनी मोफत उपलब्ध करून दिली आहे.



उन्हाचे प्रमाण जास्त असल्याने भरपूर पाणी आणि सॉफ्ट ड्रिंक चा वापर पर्यटकांकडून केला जातो. 

वापर झाल्यानंतर या रिकाम्या प्लास्टिकच्या बाटल्या वाटेल तिथे फेकून दिलेल्या आढळल्या.

ट्रेकिंग पलटन पुणे च्या सदस्यांनी मंदिर आणि आजूबाजूच्या परिसरात फेकून दिलेला हा सगळा प्लास्टिक कचरा गोळा करून पर्यावरण स्वच्छतेचा संदेश दिला. 

ट्रेकिंग पलटन पुणे ग्रुपने आलेल्या पर्यटकांची संवाद साधून 'सोबत आणलेले सर्व प्लास्टिक सोबत घेऊन जावे.'असा संदेश दिला. पर्यटकांनी सुद्धा या सकारात्मक प्रतिसाद दिला. 



पळसनाथ मंदिराजवळच असलेल्या रामायणातील विविध प्रसंगांवर आधारित सुबक मूर्ती असलेले प्राचीन राम मंदिर सुद्धा येथे आहे. या परिसरात सुद्धा प्रचंड प्लास्टिकचा कचरा पसरलेला दिसला. 



ट्रेकिंग पलटन पुणे ग्रुप तर्फे या स्वच्छता मोहिमेत  संदीप जाधव,  संदीप चौधरी, श्रीरंग गोरसे, महेश केंद्रे, गोकुळ लोंढे, नामदेव हटवार, ज्ञानेश्वर विळेकर, प्रतिक अडागळे, वरूण पेडणेकर चि. आविष्कार कवितके, अभिजीत कवितके आणि डॉ. सुरेश इसावे यांनी योगदान दिले.

जाहिरात व बातमी संपर्क 

संपादक - डॉ.संदीप गाडेकर 

मो. - 8208185037

Comments

Popular posts from this blog

अपघातग्रस्त विद्यार्थिनीस मदतीचे आवाहन

राजेंद्र भोजने व उज्वला टेमगिरे यांना पीएच. डी. पदवी जाहीर

वैष्णवी लक्ष्मण मखर हिचे सी. ए. परीक्षेत घवघवीत यश