मावळ शिक्षक प्रबोधन परिवार संचलित वसंतचैतन्य व्याख्यानमाला उत्साहात संपन्न

मावळ शिक्षक प्रबोधन परिवार संचलित.. वसंतचैतन्य व्याख्यानमाला नुकतीच वडगांव मावळ येथे पार पडली. यात पहिल्या दिवशी माजी सनदी अधिकारी इंद्रजित देशमुख यांनी तर दुसऱ्या दिवशी हास्य कवी अशोक नायगावकर आणि तिसऱ्या दिवशी मराठी भाषांच्या सदिच्छादूत, ख्यातनाम अभिनेत्री चिन्मयी सुमीत यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. या व्याख्यानमालेसाठी तालुक्यातील बहुसंख्य शिक्षक उपस्थित होते. दररोज व्याख्यानानंतर ११ गुणवंत शिक्षकांना 'सानेगुरुजी पुरस्कार', 'राष्ट्रमाता जिजाऊ गुणवंत शिक्षिका पुरस्कार' तर तालुक्यात आदर्श काम करणाऱ्या ११ शिक्षक जोडप्यांना 'साऊ-ज्योती गुणवंत शिक्षक दाम्पत्य पुरस्कार' अशा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.



समाजधुरिणांच्या मार्गाने चाला. -इंद्रजित देशमुख.



माजी सनदी अधिकारी तथा निरुपणकार इंद्रजित देशमुख यांनी 'माणूस म्हणून जगण्यासाठी..' आपल्याला समाजधुरिणांच्या मार्गाने चालण्याचा सल्ला दिला. छत्रपती शिवराय, भगवान गौतम बुद्ध, महात्मा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील यांसारख्या अनेक थोर महापुरुषांनी समाज घडवण्यासाठी आपलं अवघं आयुष्य वेचलं. स्वतःच्या उदात्त त्यागातून त्यांनी आपल्यासाठी एक पोषक समाज तयार केलेला आहे. हाच पोषक समाज आपण आपल्या भावी पिढीला हस्तांतरित करण्यासाठी  आपणही अत्यंत जबाबदारीने वागले पाहिजे, आपलं माणूस म्हणून जगणं केवळ आदर्श तत्वांवर आधारित असलं पाहिजे.. असे प्रतिपादन इंद्रजीत देशमुख यांनी केले.


हास्य म्हणजे सुखी जीवनाचा महामंत्र- कवी अशोक नायगावकर



आपल्या निरामय जगण्यासाठी हास्यविनोद अत्यंत आवश्यक आहे आणि यातूनच आपल्या निरोगी जीवनाची पायाभरणी होते. याकरिता आपण नियमित मनमोकळ्या विचारांची, दिलखुलास गप्पागोष्टींची आदान-प्रदान करायला हवी. असे मत सुप्रसिद्ध हास्यकवी अशोक नायगावकर यांनी मांडले. त्यांनी आपल्या दैनंदिन जीवनातील विविध खुमासदार किस्से आणि विडंबन कवितांच्या माध्यमातून त्यांनी श्रोत्यांना  खळखळून हसवले आणि तणावमुक्तीचा राजमार्ग विनोद हाच आहे असे सांगितले.



मातृभाषेतूनच शिक्षण हा तर मुलांचा मुलभूत अधिकार.- चिन्मयी सुमीत

विद्यार्थीदशेतील कोवळ्या मुलांना त्यांच्या नैसर्गिक पर्यावरणातील भाषेतून म्हणजेच त्यांच्या मातृभाषेतूनच शिक्षण मिळाले पाहिजे. त्यांच्या भाषिक, भावनिक आणि मानसिक अशा विविध प्रकारच्या विकासात मातृभाषेला अन्य पर्याय असूच शकत नाही. कोणत्याही प्रकारच्या शिक्षणात मायबोली हीच अत्यंत महत्त्वाची असते. मात्र अन्य पाहुण्या भाषेतून जर मुलांना आपण शिक्षणाचा हट्ट धरला तर मुले कायमस्वरूपी संकोचतात. त्यांच्या नैसर्गिक वृत्ती दडपल्या जातात. आणि नंतर याच बाबींकडे पालकांचे अक्षम्य दुर्लक्ष झाल्याने मुलांच्या मानसिकतेवर विपरीत परिणाम होत चाललेले आहेत. मातृभाषा कोणतीही असो पण किमान प्राथमिक शिक्षण तरी मातृभाषेतूनच हा त्या त्या बालकाचा नैसर्गिक अधिकार आहे. आणि तो आपण कोणत्याही अग्राह्य सबबीखाली हिरावून नये असे कळकळीचे प्रतिपादन ख्यातनाम अभिनेत्री तथा मराठी शाळांच्या सदिच्छादूत चिन्मयी सुमित यांनी केले.


सदर व्याख्यानांचे अध्यक्षपद अनुक्रमे सौ. किरणताई ब्रिजेंद्र किल्लावाला, श्री. बाबासाहेब औटी, सौ. रजनीगंधा खांडगे यांनी भुषवले. प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असणारे पुणे ग्रामीणचे डीवायएसपी सत्यसाई कार्तिक, मावळचे गटविकास अधिकारी सुधीर भागवत, वडगांव मावळचे पोलिस अधीक्षक कुमार कदम, शिक्षणविस्तार अधिकारी शोभा वहिले, अशोक गायकवाड, हिरामण लंघे यांनी शिक्षकांना मार्गदर्शन केले. या व्याख्यानमालेत संत तुकाराम शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव श्री अशोक बाफना व प्राध्यापिका सौ. प्रिती महाले यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाचे सुत्रसंचलन अनुक्रमे मुकुंद तनपुरे, संतोष गायकवाड, गणेश धिवार यांनी केले तर आभार अमोल चव्हाण, गोरक्ष जांभूळकर, तानाजी शिंदे यांनी मानले.


कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी मावळ शिक्षक प्रबोधन परिवाराचे संस्थापक राजू भेगडे, शिवाजी ठाकर, वसंतचैतन्य व्याख्यानमालेचे अध्यक्ष रामराव जगदाळे, बाळासाहेब घारे, मारुती लायगुडे, नारायण गायकवाड, संतोष राणे, उमेश माळी, सुहास धस, संतोष भारती, अजिनाथ शिंदे, अतुल वाघ, ज्ञानेश्वर शिवणेकर, भरत शेटे, संजय ठुले, राहुल जाधव, गंगासेन वाघमारे आदिंनी परिश्रम घेतले.


सानेगुरुजी गुणवंत शिक्षक पुरस्कार


श्री लक्ष्मण श्रीरंग कांबळे

श्री बाळासाहेब भिकाजी चोरघे

श्री महादू शंकर केदारी

श्री संतोष ज्ञानदेव कांबळे

 श्री काळु किसन गुणाट

श्री धोंडीबा ज्ञानेश्वर घारे

श्री गौतम ज्ञानेश्वर जुगदार

श्री संदीप शंकर सकपाळ

श्री विकास बन्सी भवार

श्री जयवंत बळवंत पवार



राष्ट्रमाता जिजाऊ गुणवंत शिक्षिका पुरस्कार

सौ. सुलभा प्रवीण गायकवाड(घाडगे)

सौ. गीतांजली प्रवीण काटे

सौ. किरण सचिन लाहुडकर

सौ. सुरेखा मच्छिंद्र बारवकर

श्रीम. वैशाली पंकज पवार 

सौ. सविता दीपक पेटकर

श्रीम. वनिता तानाजी राजपूत

सौ. दीपाली शाम अंगीर

सौ. प्राजक्ता मच्छिंद्र वाघोले

सौ. अर्चना नवनाथ गाढवे

सौ. प्रतिभा प्रमोद पाटील

श्रीम. पौर्णिमा हरिश्चंद्र ढमाले


साऊ-ज्योती गुणवंत दांपत्य पुरस्कार


सौ. वैशाली उमेश विश्वासराव (कल्हाट)

श्री. उमेश हनुमंत विश्वासराव (कल्हाट)


सौ. उज्वला मारुती डोके (वराळे)

श्री. मारुती आत्माराम डोके (थुगाव)


सौ. मनीषा धनंजय नवले (चांदखेड)

श्री. धनंजय केरबा नवले (कडधे)


सौ. कविता अंकुश मोरमारे (जांभूळ)

श्री. अंकुश ज्ञानू मोरमारे (लष्करवाडी)


सौ. स्वाती धिरजकुमार जानराव (बेबडओहोळ)

श्री. धिरजकुमार महादेव जानराव (मळवंडी ढोरे)


सौ. अनिता अशोक बारवे (कान्हे)

श्री. अशोक बाबुराव बारवे (वराळे)


सौ. अनुजा सुहास धस (गोवित्री)

श्री. सुहास कुंडलिक धस (बुधवडी)


सौ. मनिषा बन्सिलाल कोल्हे (शिलाटणे)

श्री. बन्सिलाल संभाजी कोल्हे (वाडीवळे)


सौ. स्नेहल सुनिल पाष्टे (बोरज)

श्री सुनिल शिवराम पाष्टे (खामशेत)


सौ. वैशाली अशोक मिसाळ (पुसाणे)

श्री. अशोक पांडुरंग मिसाळ (कुसगाव प.मा.)


सौ. अश्विनी त्र्यंबक आहेर (खडकाळा)

श्री. त्र्यंबक सक्रुभाऊ आहेर (नेसावे)


बातमी व जाहिरात संपर्क 

संपादक - डॉ. संदीप गाडेकर

मो.- 9881914913

Comments

Popular posts from this blog

अपघातग्रस्त विद्यार्थिनीस मदतीचे आवाहन

राजेंद्र भोजने व उज्वला टेमगिरे यांना पीएच. डी. पदवी जाहीर

वैष्णवी लक्ष्मण मखर हिचे सी. ए. परीक्षेत घवघवीत यश