उद्यापासून ग्रामदैवत श्री. डोळसनाथ महाराज सार्वत्रिक उत्सवास सुरुवात

 

तळेगाव दाभाडे  दि. ८ (प्रतिनिधी) तळेगाव दाभाडे येथील ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराज सार्वत्रिक उत्सवात भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन दिनांक 9 ते 12 एप्रिल 2024 दरम्यान होणार आहे.

  ग्रामदैवत श्री. डोळसनाथ महाराज यांचा चैत्र शुध्द प्रतिपदा गुढीपाडव्याचा सार्वत्रिक यात्रा उत्सव यावर्षी 9 ते 12 एप्रिल 2024 या कालावधीत संपन्न होणार आहे. यानिमित्त विविध धार्मिक, सांस्कृतिक, निकाली कुस्ती स्पर्धा, बैलगाडा स्पर्धा तसेच मनोरंजनाचे भरगच्च कार्यक्रम होणार असल्याचे उत्सव समितीचे अध्यक्ष मिथुन मारुती काकडे यांनी सांगितले. तळेगाव पंचक्रोशीतील भाविकांनी आवर्जून सर्व कार्यक्रमांना उपस्थित राहावे असे आवाहन डोळसनाथ महाराज उत्सव समिती व मंदिर नवनिर्माण समितीकडून करण्यात आले आहे.

या उत्सवात दि. 9 एप्रिल रोजी सकाळी श्री. डोळसनाथ महाराजांचा अभिषेक, दुपारी मोठ्या रकमेचे बक्षीस ठेवलेल्या बैलगाडा स्पर्धा, सायंकाळी श्री. डोळसनाथ महाराज यांची पालखी मधून ग्रामप्रदक्षिणा, रात्री घोरावाडी स्टेशनच्या मैदानावर कै. लोकशाहीर साहेबराव नांदवळकर यांचे आश्रयाखाली वसंत नांदवळकर सह रवींद्र पिंपळे यांचा 'तंटा तिघींचा पण नवरा कुणाचा' या नाट्याव्दारे लोकनाट्य तमाशा तसेच श्री डोळसनाथ महाराज मंदिरा समोर श्री राम कला पथक मंडळ पवळेवाडी यांचे रंगीत संगीत भारुडाचा कार्यक्रम होणार आहे.

दुसऱ्या दिवशी दि.10 एप्रिल रोजी सकाळी लोकनाट्य तमाशाची हजेरी तसेच गणपती माळ येथे दुसऱ्या दिवशीच्या बैलगाडा स्पर्धाचे आयोजन केले आहे. तसेच यात्रेकरूंची भांडाराच्या रूपाने भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. रात्री 8 वाजता मारुती मंदिर चौकात डीपी रोडवर बारा  गावांच्या बारा अप्सरा हा  ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम होणार आहे. 

संपादक - डॉ.संदीप गाडेकर 

जाहिरातीसाठी संपर्क - 8208185037

Comments

Popular posts from this blog

अपघातग्रस्त विद्यार्थिनीस मदतीचे आवाहन

राजेंद्र भोजने व उज्वला टेमगिरे यांना पीएच. डी. पदवी जाहीर

वैष्णवी लक्ष्मण मखर हिचे सी. ए. परीक्षेत घवघवीत यश