वीर जिजामाता प्राथमिक कन्या शाळेत नवागतांचा स्वागत समारंभ उत्साहात साजरा


तळेगाव स्टेशन दि. १५ : तळेगाव स्टेशन येथील नगरपालिकेच्या वीर जिजामाता प्राथमिक कन्या शाळा क्रं 5 मध्ये नवागतांचा स्वागत समारंभ उत्साहात पार पडला.

          नव्याने प्रवेशित झालेल्या विद्यार्थिनींचे  औक्षण करून स्वागत करण्यात आले. प्रशासन अधिकारी श्रीमती. शिल्पाताई रोडगे मॅडम, मा. नगरसेविका शोभाताई भेगडे, श्री. मनोज लांजेकर, श्री. मयुरेश मुळे, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. विजया दांगट मॅडम यांच्या हस्ते विद्यार्थिनींना मोफत पाठ्यपुस्तके  व शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.

        तळेगाव दाभाडे शहराच्या माजी नगरसेविका सौ. शोभाताई भेगडे यांच्या सहकार्याने मुलींना मोफत वह्यांचे  वाटप करण्यात आले. तसेच कै. लक्ष्मणराव जगताप यांच्या स्मरणार्थ श्री. शंकराव जगताप व श्री.मनोज लांजेकर यांच्या सहकार्याने मुलींना देखील विद्यार्थिनींना मोफत वह्याचे वाटप करण्यात आले. 

   सदरील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. संतोष बच्चे सर यांनी तर शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. विजया दांगट मॅडम यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले. यावेळी शाळेमधील सर्व शिक्षक उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

अपघातग्रस्त विद्यार्थिनीस मदतीचे आवाहन

राजेंद्र भोजने व उज्वला टेमगिरे यांना पीएच. डी. पदवी जाहीर

वैष्णवी लक्ष्मण मखर हिचे सी. ए. परीक्षेत घवघवीत यश