युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या पुणे जिल्हा उपाध्यक्षपदी महेश भागीवंत

 


तळेगाव स्टेशन दि. 20 (प्रतिनिधी)  तळेगाव दाभाडे येथील युवा पत्रकार महेश सुधाकर भागीवंत यांची युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या पुणे जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.  पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलवार आणि जिल्हाध्यक्ष गणेश महाडिक यांनी बुधवारी त्यांना  नियुक्तीपत्र दिले.

भागीवंत हे पत्रकारिता क्षेत्रातील पदवीधर असून  विविध वृत्तपत्रांमध्ये काम केले आहे. सामाजिक  प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी त्यांनी लेखन केले आहे.  एनजीओ फेडरेशन महाराष्ट्र राज्य मावळ तालुका उपाध्यक्ष पदावर सुद्धा काम केले आहे. 

सदर निवड जाहीर होताच पुढारीचे उपसंपादक अमीन खान, तळेगाव दाभाडे प्रेस फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विलास भेगडे, कार्याध्यक्ष जगन्नाथ काळे, प्रेस फाउंडेशन मधील सर्व सदस्य आणि पत्रकार राजेंद्र जगताप यांनी भागीवंत यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या.

ग्रामीण भागातील युवा आणि विद्यार्थ्यांना पत्रकारिता आणि माध्यमातील बदलांचे प्रशिक्षण देण्यावर आपल्या कार्यकाळात काम करणार असल्याचे भागीवंत यांनी सांगितले.

Comments

Popular posts from this blog

अपघातग्रस्त विद्यार्थिनीस मदतीचे आवाहन

राजेंद्र भोजने व उज्वला टेमगिरे यांना पीएच. डी. पदवी जाहीर

वैष्णवी लक्ष्मण मखर हिचे सी. ए. परीक्षेत घवघवीत यश