प्रा. संतोष थोरात स्व. शिवाजीराव पाटील जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मानित

 

राजगुरुनगर ता. 9 जून 2024

आनंद विद्यानिकेतन हायस्कूल विमाननगर शाळेतील विद्यार्थी प्रिय, इंग्रजी विषयाचे शिक्षक संतोष थोरात यांना राजगुरुनगर येथे स्व. शिवाजीराव पाटील जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार खेडचे कार्यसम्राट आमदार दिलीपजी मोहिते पाटील यांच्या हस्ते व राज्याचे अध्यक्ष मा. आमदार नानासाहेब बोरस्ते, कार्याध्यक्ष जी.के. थोरात, खेडचे मा. आमदार राम कांडगे, शिरूरचे मा. आमदार पोपटराव गावडे पुणे विभाग टीडीएफचे अध्यक्ष प्राचार्य शिवाजीराव कामथे राज्याचे सचिव हिरालाल पगडाल, पुणे जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षण अधिकारी डॉ. भाऊसाहेब कारेकर साहेब, पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष वसंतराव ताकवले, सचिव पंकज घोलप , माध्यमिक विभागाचे सचिव प्रा. सचिन दुर्गाडे,यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात आला.

  टीडीएफ चे माजी आमदार स्व. शिवाजीराव पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त या पुरस्कार सन्मान सोहळ्याचे आयोजन पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ व पुणे जिल्हा टीडीएफ यांच्या वतीने करण्यात येते. यावर्षी हा कार्यक्रम राजगुरुनगर येथील खांडगे लॉन्स कार्यालयामध्ये आयोजित करण्यात आला होता.

 संतोष थोरात हे गेले वीस वर्षापासून अध्ययन अध्यापन क्षेत्रामध्ये कार्यरत असून उत्तम वक्ते, लेखक, पत्रकार व व्याख्याते आहेत. त्यांची इंग्रजीची तीन पुस्तके प्रकाशित झालेले असून जर्मन भाषेचे प्रशिक्षक सुद्धा ते आहेत. त्यांचे शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील योगदान लक्षात घेता या पुरस्कारासाठी पुणे शहरातून निवड करण्यात आलेली होती. त्यांना आजपर्यंत अनेक शैक्षणिक व सामाजिक पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलेले आहे. हा पुरस्कार त्यांनी  सपत्नीक स्वीकारला. यामध्ये शाल श्रीफळ, सन्मानचिन्ह व मानपत्राचा समावेश आहे.

हा पुरस्कार मिळाल्यामुळे शैक्षणिक व सामाजिक जबाबदारी वाढली असून येणाऱ्या काळामध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी कायम कटिबद्ध असल्याचे मत संतोष थोरात यांनी व्यक्त केले.

 यावेळी पुणे शहर माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष प्राचार्य राज मुजावर, पुणे माध्यमिक पतपेढीचे मा. अध्यक्ष विजय कचरे, पुणे शहर जुनिअर कॉलेज टीडीएफचे सचिव प्रा. आरविंद मोडक उपाध्यक्ष द्वारकानाथ दहिफळे, कार्याध्यक्ष अशोकराव धालगडे, डॉ. संदीप गाडेकर, बाळासाहेब इमडे, उपाध्यक्ष सुनील गिरमे, दत्तात्रय बनकर तसेच पुणे शहर व जिल्ह्यातील शिक्षक व बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

कामाचे सूत्रसंचालन मुरलीधर मांजरे यांनी केले तर आभार दिलीप ढमाले यांनी मानले.

Comments

Popular posts from this blog

अपघातग्रस्त विद्यार्थिनीस मदतीचे आवाहन

राजेंद्र भोजने व उज्वला टेमगिरे यांना पीएच. डी. पदवी जाहीर

वैष्णवी लक्ष्मण मखर हिचे सी. ए. परीक्षेत घवघवीत यश