शिवराज्याभिषेक 350 सोहळा वर्षाच्या निमित्ते राजधानी रायगड अभ्यास सहल यशस्वीरित्या संपन्न

 


तळेगाव स्टेशन दि. 6 (प्रतिनिधी)

    शिवशाही दुर्गाभ्यास परिवार व लॅटीस परिवार उत्सव समिती संयुक्त आयोजित राजधानी रायगड अभ्यास सहल नुकतीच यशस्वीरित्या पार पडली.   

 शिवशाही दुर्गाभ्यास परिवारचे डॉ.प्रमोद बोराडे व डॉ.प्रिया बोराडे यांनी संपूर्ण ट्रेकचे उत्कृष्ठ नियोजन केले होते. रायगड वरील संपूर्ण इतिहासाची डॉ.बोराडे यांनी इथंभूत कालनिहाय व्याख्याने घेतली. यात शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक का व कसा झाला तसेंच त्याचे काय परिणाम काय झाले, रायगड सुरक्षा कशी होती, राजधानीचे भौगोलीक व ऐतिहासिक महत्व काय होते, शिवरायांच्या मृत्युचे खरे कारण काय होते, वाघ्या कुत्रा आणी सत्य काय, दुर्गावरील शिलालेख व त्याचा अर्थ काय तसेंच रायगडाचा प्राचिन ते भारताच्या स्वतंत्र्यापर्यंतचा इतिहास डॉ. बोराडे यांनी सांगितला.

 तळेगाव दाभाडे शहर पंचक्रोशी मध्ये पहिल्यांदाच सुमारे १०८ शिलेदारांचा ग्रुप या अभ्यास मोहिमेकरता रायगडावर दाखल झाला होता. वातावरण आल्हाददायक असल्याने सर्वांनी या ट्रेकचा मनमुराद आनंद घेतला. सदर अभ्यास सहल यशस्वी करण्यासाठी लॅटिस सोसायटीचे अध्यक्ष शैलेश भेगडे यांच्या सहित शिवप्रेमी,कला दिग्दर्शक  सुभाष शिरसाट, उत्सव समिती अध्यक्ष किशोर भेगडे कार्याध्यक्ष  विवेक ठाकूर , अभ्यास सहल यशस्वितेसाठी समूह नियोजन मानसी अतिश बोराडे व शुभांगी शिरसाट , प्रीती महाजन, मिताली देशपांडे,यांनी पाहिले.  व्यवस्थापक स्वप्निल नवले, संग्राम दाभाडे,  वैभव महाजन, अमित देशपांडे,  सुदाम गोडसे, शैलेंद्र ढमढेरे, संदीप ढवळे,  राजेश देवतळे, योगेश राऊत यांनी मोहीम यशस्वी करण्याकरिता अथक परिश्रम घेतले.

  लॅटिस परिवारच्या सर्व मंडळींनी जिजाऊ माँसाहेब समाधी स्थानी एक संकल्प सोडला, "पुढील काळात देखील दुर्गाभ्यास सहली सातत्याने आम्ही करणार आहोत व यातून आपली संस्कृती, इतिहास, अध्यात्म व भारतीय परंपरा आपल्या पुढील पिढीस वारसारुपी देण्याचा प्रयत्न लॅटिस परिवाराकडून सतत व अखंडित होत राहील"

Comments

Popular posts from this blog

अपघातग्रस्त विद्यार्थिनीस मदतीचे आवाहन

राजेंद्र भोजने व उज्वला टेमगिरे यांना पीएच. डी. पदवी जाहीर

वैष्णवी लक्ष्मण मखर हिचे सी. ए. परीक्षेत घवघवीत यश