आषाढी एकादशीनिमित्त संत ज्ञानेश्वर शाळेत पालखी सोहळ्याचे आयोजन



तळेगाव दाभाडे दि.16 (संपादक- डॉ.संदीप गाडेकर) येथील पीएम श्री. संत ज्ञानेश्वर प्राथमिक शाळा क्र 6 नगरपरिषद शिक्षण मंडळ तळेगाव दाभाडे यांच्या वतीने आषाढी एकादशीनिमित्त पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. शाळेचे मुख्याध्यापक  केशव चिमटे यांच्या हस्ते पालखी पूजन करून पालखी सोहळ्याचे उद्घाटन करण्यात आले. या पालखी सोहळ्यात शाळेतील 550 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. 


संत ज्ञानेश्वर शाळा ते श्री. विठ्ठल रुक्मिणी मंदिर जोशीवाडा अशी विद्यार्थ्यांची पायी दिंडी काढण्यात आली. विद्यार्थ्यांनी विठ्ठल रुक्मिणी, विविध संत व वारकरी वेशभूषा परिधान केल्या होत्या. या दिंडी सोहळ्यात  शिक्षक, पालक व शालेय व्यवस्थापन समितीने उत्स्फूर्त सहभाग  घेतला होता. यासोबतच तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या वतीने पर्यावरण दिंडी काढण्यात आली होती. यावेळी तळेगाव दाभाडे शहर समन्वयक गीतांजली होनमाने व त्याचे सहकारी उपस्थित होते.


बातमी व जाहिरात संपर्क 

डॉ.संदीप गाडेकर 

8208185037

Comments

Popular posts from this blog

राजेंद्र भोजने व उज्वला टेमगिरे यांना पीएच. डी. पदवी जाहीर

वैष्णवी लक्ष्मण मखर हिचे सी. ए. परीक्षेत घवघवीत यश

कामगार ते पीएच.डी.पदवीधर : डॉ.सुनील मगन मोरे यांचा प्रेरणादायी प्रवास