माउंटन एज ॲडवेंचर्सचे संस्थापक सदस्य रोहित नागलगांव यांना पीएच.डी. प्रदान

 



तळेगाव दाभाडे दि.6 (प्रतिनिधी)  माउंटन एज ॲडवेंचर्स ॲंड वाईल्ड ट्रेल्स संस्थेचे  रोहित नागलगाव यांना मुंबई विद्यापीठाने पीएचडी प्रदान केली आहे. रोहित नागलगाव यांनी "एक्स सिटु कंजर्वेशन ऑफ़ एंडेंजर्ड महासिर इन इंद्रायणी रिव्हर, पुणे, इंडिया" या विषयावर आपला शोधप्रबंध मुंबई विद्यापिठाला सादर केला होता. मुंबई विद्यापिठाच्या रत्नागिरी उपकेंद्रतील सहयोगी प्राध्यापक डॉ. पांडुरंग पाटील यांचे मार्गदर्शन नागलगाव यांना लाभले. 

या संशोधन कामात डॉ. प्रविण सप्तर्षी, डॉ. शशांक ओगले, डॉ. सुधाकर इंदुलकर आदी मान्यवरांचे  मोलाचे मार्गदर्शन मिळाले. रोहित नागलगांव यांनी या संशोधन कार्यादरम्यान आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्तरावर शोधनिबंध सादर केले आहेत. इंडियन सायन्स यूथ कॉंग्रेस परिषदेमधे मौखिक सादरीकरणामधे तृतीय क्रमांक व इंटरनॅशनल मल्टीडिसिप्लनरी कॉन्फरन्स ऑन ईमर्जिंग ट्रेंड्स इन सायन्स ॲण्ड टेक्नॉलॉजी मधे त्यांनी प्रथम क्रमांक मिळवला आहे. श्री रोहित हे मागील १५ वर्षापासुन गिर्यारोहण व निसर्ग संवर्धन कार्यात उल्लेखनिय काम करत असल्याचे माउंटन एज ॲडवेंचर्सचे अनिल जाधव यांनी सांगितले. या संस्थेचे गिर्यारोहक मनोज राणे, मंदार थरवल व सर्व सभासद यानी रोहित नागलगाव यांच्या यशाचे कौतुक केले व संस्थेच्या माध्यमातुन पुढील कार्यास शभेच्छा दिल्या.

Comments

Popular posts from this blog

अपघातग्रस्त विद्यार्थिनीस मदतीचे आवाहन

राजेंद्र भोजने व उज्वला टेमगिरे यांना पीएच. डी. पदवी जाहीर

वैष्णवी लक्ष्मण मखर हिचे सी. ए. परीक्षेत घवघवीत यश